पुरस्काराचे नाव बदलताच भारताला पदक मिळाले! ‘हे’ आहे भाजप खासदाराचे ट्वीट

पुरस्काराचे पूर्वीचे नाव बदलल्यामुळेच खेळांच्या पदकांना लागलेले ग्रहण सुटले आहे, अशी प्रतिक्रिया भाजप खासदार आणि काही नेटक-यांनी व्यक्त केली आहे.

129

भारतासाठी टोकियो ऑलिम्पिकची सोनेरी सांगता झाली. भालाफेक प्रकारात सुवर्णपदक जिंकत, नीरज चोप्राने इतिहास रचला. त्यानंतर त्याच्यावर तमाम भारतीयांनी कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव केला. पण सोशल मीडियावर नीरजला शुभेच्छा देताना, हा खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलल्याचा परिणाम आहे, असे काही नेटक-यांनी ट्वीट करत म्हटले आहे. केवळ नेटकरीच नाही तर एका भाजपच्या खासदारानेही असे ट्वीट केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 ऑगस्ट रोजी राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नामांतरण मेजर ध्यानचंद पुरस्कार असे केले. त्यानंतर दुस-याच दिवशी म्हणजेच 7 ऑगस्टला नीरज चोप्राने अ‍ॅथलिटीक्स क्रीडा प्रकारात भारतासाठी पहिले सुवर्णपदक पटकावले. त्याचा संबंध काही नेटक-यांनी खेलरत्न पुरस्काराच्या नावाशी जोडला आहे. पुरस्काराचे पूर्वीचे नाव बदलल्यामुळेच खेळांच्या पदकांना लागलेले ग्रहण सुटले आहे, अशी प्रतिक्रिया भाजप खासदार आणि काही नेटक-यांनी व्यक्त केली आहे.

(हेही वाचाः खेलरत्न पुरस्काराची ओळख आता मेजर ध्यानचंद यांच्या नावाने!)

भाजप खासदाराचे ट्वीट

भाजपचे लडाख येथील खासदार जामयांग नामग्याल यांनीही ट्वीट केले आहे. खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलताच भारताला सुवर्णपदक मिळालं. बहुदा नावामुळे कृपा होत नव्हती, असं ट्वीट जामयांग नामग्याल यांनी केले आहे.

(हेही वाचाः नीरज चोप्राचे ‘हेच’ ट्वीट आज उतरलं सत्यात…! नेटकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद!)

नेटक-यांनीही केले ट्वीट

खेलरत्न पुरस्काराच्या जुनं नाव अशुभ होतं. ते नाव बदलताच नीरजला पदक मिळालं. त्यामुळे आम्ही मोदींचा हा निर्णय अगदी योग्य आसून आम्ही त्याच स्वागत करतो, असे ट्वीट काही नेटक-यांनी केले आहे.

https://twitter.com/priyaCh41814890/status/1423988609036677126?s=20

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हे नावच जरा अशुभ होते. ते बदलून मेजर ध्यानचंद यांचे नाव देताच भारताला टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळालं. यालाच म्हणतात नाममहात्म्य असे ट्वीट एका नेटक-याने केले आहे.

 

मराठी अभिनेता आणि बिग बॉस मराठी फेम आरोह वेलणकर यानेही यासंदर्भात एक ट्वीट केले आहे. काल नाव बदललं पुरस्काराचं आणि आज लगेच मेडल, वाह. नावात प्रॅाब्लेम होता का काय?, असा प्रश्न त्याने विचारला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.