‘या’ तारखेपासून सुरू होणार NEET PG समुपदेशन, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची घोषणा

139

वैद्यकीय कोट्यात ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली त्यानंतर NEET पीजीसाठी काऊंसलिंग सुरु करण्यास मान्यता दिली होती. आता नीट पीजीची काऊंसलिंग 12 जानेवारीपासून सुरु होणार असल्याचं केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी रविवार, 09 जानेवारी रोजी NEET समुपदेशनाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय सल्लागार समितीला (MCC) वैद्यकीय महाविद्यालयाच्या पीजी जागांसाठी समुपदेशन प्रक्रियेस पुढे जाण्याची परवानगी दिल्यानंतर हे आले आहे. NEET PG उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अर्जाची लिंक सक्रिय केल्यानंतर MCC वेबसाइट mcc.nic.in वर स्वतःची नोंदणी करू शकतील.

काय म्हणाले केंद्रीय आरोग्यमंत्री

दरम्यान, 7 जानेवारीलासर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात निकाल दिला होता. ईडब्ल्यूएस आरक्षणासाठी असणाऱ्या क्रिमीलेयर म्हणजे आर्थिक उत्पन्नाच्या आठ लाख रुपयांच्या मर्यादेसंदर्भातील निर्णयावर मात्र मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात सुनावणी होईल, असे न्यायालयाने म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, निवासी डॉक्टरांना आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आश्वासनानुसार NEET-PG समुपदेशन 12 जानेवारी 2022 पासून MCC द्वारे सुरू केले जात आहे. यामुळे कोरोनाविरुद्धच्या लढाईत देशाला अधिक बळ मिळेल. सर्व उमेदवारांना माझ्या हार्दिक शुभेच्छा, असे आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट केले आहे.

(हेही वाचा –काय सांगताय! आता रेल्वे स्टेशनवर आधार, पॅनकार्ड, तिकीटासह विमाही काढता येणार)

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या तारखांची घोषणा

नुकतेच, सर्वोच्च न्यायालयाने NEET UG आणि PG मध्ये OBC साठी EWS साठी 10 टक्के ते 27 टक्के आरक्षण देण्याचा केंद्राचा निर्णय कायम ठेवून NEET समुपदेशन सुरू करण्याचा मार्ग मोकळा केला होता. त्यानंतर वैद्यकीय समुपदेशन समितीने (MCC) नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (NEET) UG, PG काउंसिलिंग 2021 बाबत नोटीस देखील जारी केली आहे. एमसीसीने जारी केलेल्या नोटीसमध्ये विद्यार्थ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे. तसेच समुपदेशनाचे वेळापत्रक mcc.nic.in या अधिकृत वेबसाइटवर लवकरच प्रसिद्ध केले जाईल, असे आश्वासन दिले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.