नेपाळमधील विमान अपघातात ठार झालेल्या ठाण्यातील मृतांपैकी एकाच्या बॅंक खात्यातून 14.6 लाख रुपये काढल्याचा तसेच, मृत व्यक्तीच्या नावावर 5.6 लाख रुपयांचे कर्जही घेतल्याचा प्रकार उघड झाला आहे.
ठाण्याच्या त्रिपाठी कुटुंबातील वैभवी, अशोक कुमार, धनुष आणि रितिका यांचा नेपाळमध्ये विमान अपघातात मृत्यू झाला. मात्र, वैभवीच्या खात्यातून 13 जून ते 30 जुलै दरम्यान, पैसे काढले गेल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आले. त्यानुसार, वैभवीच्या बहिणीने पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
( हेही वाचा: आता प्रत्येक विजबिलावर तिरंगा; स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महावितरणची मोहिम )
एका महिन्यात अनेक व्यवहार
बहिणीच्या पोलीस तक्रारीत म्हटले आहे की, तिला 30 जुलै रोजी तिच्या बहिणीचे सीम कार्ड तिच्या नावावर बदलून मिळाले, त्यांनतर तिला बॅंक खात्यातील फसव्या व्यवहरांबद्दल समजले. कायदेशीर वारस असल्यामुळे मी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केली आणि सीम सक्रिय झाले. त्यानंतर माझ्या बहिणीने तिच्या मृत्यूपूर्वी वापरलेल्या नंबरवर मला तीन बॅंकिंग व्यवहार झाल्याच्या सूचना प्राप्त झाल्या, ज्यात तीन वेळा पैसे काढल्याचा उल्लेख आहे. नंतर मी बॅंकेशी संपर्क साधला आणि मला कळेल की, एका महिन्यात माझ्या बहिणीच्या खात्यातून अनेक फंड ट्रान्सफर केले गेले आहेत. याप्रकरणी पोलीस उपायुक्त डाॅक्टर महेश्वर रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली त्याचे सायबर पथक तपास करत आहे.
Join Our WhatsApp Community