नेपाळमध्ये भीषण अपघात! ७२ प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले

नेपाळमध्ये विमान कोसळून मोठा अपघात झाला आहे. या विमानातून जवळपास ७२ नागरिक प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. नेपाळच्या यति एअरलाईन्सच्या ATR-72 या विमानात ६८ प्रवासी आणि ४ क्रू मेंबर्स होते.

( हेही वाचा : धक्कादायक! पोलीस अधिकाऱ्याकडून महिलेचा विनयभंग; औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल)

काठमांडूहून पोखराला जाणारे हे यति एअरलाईन्सचे विमान रविवारी सकाळी कास्की जिल्ह्यातील पोखरा येथे कोसळले. अशी माहिती यति एअरलाईन्सचे प्रवक्ते सुदर्शन बर्तौला यांनी दिली आहे. सध्या बचावकार्याला सुरूवात करण्यात आली असून विमानतळ बंद करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. सोशल मीडियाद्वारे या अपघाताचे काही फुटेज आता समोर येऊ लागले आहेत. या विमानातून धुराचे लोट बाहेर येताना दिसत आहे. खराब हवामानामुळे विमान एका टेकडीवर आदळले आणि त्यानंतर क्रॅश होऊन स्फोट झाला आणि आग लागली. आगीमुळे लोकांना बाहेर काढण्यात अडचणी येत आहेत. अपघाताचे ठिकाण हे नदीजवळ आहे अशी प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. गेल्या ३० वर्षांमध्ये पोखर – जोमसुम मार्गावर सात विमानांचे अपघात झाले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here