नेपाळमध्ये एका प्रवासी विमानाचा संपर्क तुटल्याने चिंता व्यक्त केली जात होती. रविवारी नेपाळमधील तारा एअरच्या विमानाचा संपर्क तुटला होता. विमानतळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तारा एअरच्या विमानामध्ये 22 प्रवासी होते. विमान कोसळले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले होते. मात्र आज सोमवारी बेपत्ता असलेल्या या विमानाचे अवशेष सापडले आहे.
(हेही वाचा – सिक्कीममध्ये ठाण्यातील एकाच कुटुंबातील 5 जणांचा अपघाती मृत्यू)
मिळालेल्या माहितीनुसार, मुस्तांग जिल्ह्यातील थासांग-2 येथे दुर्घटनाग्रस्त विमान आढळून आले असून नेपाळच्या लष्कराला बेपत्ता विमान शोधण्यात यश आले आहे. आतापर्यंत या अपघातातील 14 जणांचे मृतदेह सापडले आहेत.
Crash site: Sanosware, Thasang-2, Mustang pic.twitter.com/OcN93N1Qyb
— NASpokesperson (@NaSpokesperson) May 30, 2022
नेपाळमधील मुस्तांग भागात हा विमान अपघात झाला आहे. नेपाळमधील मुस्तांग जिल्ह्यातील थासांग-2 येथील सनोसवेअर येथे दुर्घटनाग्रस्त विमानाचे अवशेष सापडले असून या विमानाचे अपघातस्थळ नेपाळच्या लष्कर विभागाकडून शोधण्यात आले आहे. लष्कराच्या एका प्रवक्त्याने विमानावर क्रमांक स्पष्टपणे दिसत असलेल्या दुर्घटनाग्रस्त विमानाच्या अवशेषाच्या फोटोसह ट्विट केले आहेत. नेपाळ सैन्याच्या शोध आणि बचाव दलाने विमान अपघात स्थळाचा प्रत्यक्ष शोध घेतला असून बचाव दलाकडून सध्या तपास सुरु असल्याची माहिती मिळतेय.
Join Our WhatsApp Community