नेपाळमध्ये ४ मुंबईकरांसह २२ जणांना घेऊन जाणारे विमान बेपत्ता!

162

नेपाळमध्ये एका प्रवासी विमानाचा संपर्क तुटल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळमधील तारा एअरच्या विमानाचा संपर्क तुटला आहे. रविवारी सकाळी विमानाने उड्डाण केले. विमानतळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तारा एअरच्या विमानाने आज सकाळी पोखराहून जोमसोमला उड्डाण केले. विमानाचा शेवटचा संपर्क सकाळी ९.५५ वाजता झाला. यामध्ये २२ प्रवासी होते. विमान कोसळले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.

(हेही वाचा – मोदींची ‘Mann ki Baat’; म्हणाले, वेगाने वाढणाऱ्या स्टार्टअपपासून नवा भारत दिसतोय)

नेपाळमधील स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता विमानात ४ मुंबईकर होते जे एकाच कुटुंबातून मुंबईहून आले होते. विमान कंपनीने प्रवाशांची यादी जाहीर केली आहे, ज्यांनी अशोक कुमार त्रिपाठी, धनुष त्रिपाठी, रितिका त्रिपाठी आणि वैभवी त्रिपाठी असे चार भारतीय आहेत. एअरलाइन्सचे प्रवक्ते सुदर्शन बर्तौला यांनी सांगितले की ३ सदस्यीय नेपाळी क्रू व्यतिरिक्त ४ भारतीय नागरिक, २ जर्मन आणि १३ नेपाळी प्रवासी विमानात होते.

नेपाळी लष्कराचे प्रवक्ते नारायण सिलवाल यांनी सांगितले की, नेपाळी लष्कराचे एमआय-१७ हेलिकॉप्टर नुकतेच लेटे, मुस्तांग येथे रवाना झाले आहे.तर नेपाळच्या गृह मंत्रालयाचे प्रवक्ते फदिंद्र मणि पोखरेल यांच्या मते, मंत्रालयाने बेपत्ता विमानाचा शोध घेण्यासाठी मुस्तांग आणि पोखरा येथून दोन खाजगी हेलिकॉप्टर देखील तैनात करण्यात आले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.