एखाद्या व्यक्ती किंवा वस्तूची प्रशंसा तर कधी टीका सोशल मीडियावर होताना दिसते. सोशल मीडिया हे असं माध्यम आहे, यावरून काही क्षणातच एखादी गोष्ट जगाच्या काना-कोपऱ्यात पोहोचवली जाते. त्यावर काही नेटकरी आपलं मत व्यक्त करता, काही टीका करता तर काही त्यावर आपल्या प्रतिक्रिया शेअर करतात. सध्या असाच एक प्रकार सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे तो म्हणजे, नेस्ले कंपनी आणि त्यांचं एक उत्पादन किटकॅट चॉकलेट. नेस्लेने किटकॅट चॉकलेटवर भगवान जगन्नाथाचा फोटो लावला आहे. जेव्हा ही बातमी समोर आली, तेव्हापासून सोशल मीडियावर यावरून वाद सुरू आहे. नेटिझन्स संतप्त होऊन यावर आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहे. यावर आता नेस्ले कंपनीने अखेर दिलगीरी व्यक्त करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
टीकेनंतर काय म्हणाली कंपनी
मॅगी, दुधाची पावडर यांसारख्या दैनंदिन वापराच्या वस्तू बनवणाऱ्या नेस्ले इंडियाने गुरुवारी सांगितले की, त्यांनी त्यांच्या भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि माता सुभद्रा यांचे फोटो असलेले लोकप्रिय चॉकलेट ब्रँड किटकॅटचे बॉक्स बाजारातून परत मागवले आहेत. कंपनीला किटकॅट पॅकेट्सवरील भगवान जगन्नाथ फोटोंमुळे सोशल मीडियावर ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. लोकांनी कंपनीवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला होता.
(हेही वाचा – कोरोना लसीचे दोन डोस नाही, तर रेल्वे प्रवास नाही; मनाई कायदेशीरच!)
नेस्ले इंडियाने याबद्दल खेद व्यक्त केला आणि सांगितले की, ज्या बॉक्सवर हे फोटो होते ते बॉक्स परत मागवण्यासाठी तातडीने पावले उचलली आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, “आम्ही या प्रकरणाची संवेदनशीलता समजून घेतो आणि अनावधानाने कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असल्यास आम्ही दिलगीर आहोत. गेल्या वर्षीच आम्ही ते पॅक बाजारातून काढून घेतले होते. नेस्ले इंडियाच्या मते, देशातील सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणे जनतेपर्यंत पोहोचवणे हाच त्याचा उद्देश होता. म्हणून ओडिशाची संस्कृती चॉकलेटच्या रॅपरवर दाखवण्यात आली होती.
नेटिझन्स झाले संतप्त
कंपनीने प्रमोशनसाठी चॉकलेटच्या रॅपरवर भगवान जगन्नाथाचा फोटो लावला होता. हे पाहून नेटिझन्स संतप्त झाले होते. यावेळी लोकांनी सांगितलं, की अशा जाहिरातींमुळे त्यांच्या भावना दुखावल्या जात आहेत.
https://twitter.com/AshokVayde/status/1483709625727782913
Join Our WhatsApp Communityकिसने अधिकार दिया #kitkat को भगवान #जगन्नाथ जी का तस्वीर छापने का ?
लोग चॉकलेट खाने के बाद पैकेट को कूड़ेदान में या रोड पर फैंक देते हैं
यह हिन्दू समाज की आस्था से खिलवाड़ है
हिंदू समाज किटकैट का संपूर्ण बहिष्कार करे#Boycott_Kitkat#Boycott_Nestle pic.twitter.com/JJLiQmw5gt— राणा केदार चन्देल (@ranakedar) January 19, 2022