नवी दिल्लीतील इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा लागणार आहे. येत्या 8 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेताजींच्या पुतळ्याचे अनावरण करतील. यावेळी बोस यांचे कुटुंबीय आणि नातलगही उपस्थित राहणार आहेत.
अमर जवान ज्योतीच्या जागी पुतळा
इंडिया गेटवरील अमर जवान ज्योती इतरत्र हलवल्यानंतर नेताजींच्या 125व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र यांच्या होलोग्राम पुतळ्याचे अनावरण केले होते. रिकाम्या चबुतऱ्यावर संध्याकाळी नेताजींचा हॉलोग्रमचा पुतळा दिसत असे. परंतु, विरोधकांनी त्यावर टीका सुरू केल्यामुळे तो प्रकल्प बंद करण्यात आला. आता या जागेवर येत्या 8 सप्टेबर रोजी नेताजींचा ग्रॅनाइटचा पुतळा बसवण्यात येणार आहे. म्हैसूरचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी नेताजींचा हा 30 फूट उंचीचा पुतळा उभारला आहे. नॅशनल मॉडर्न आर्ट गॅलरीचे संचालक, प्रसिद्ध शिल्पकार अद्वैत गडनायक यांचाही या पुतळ्याच्या निर्मितीत सहभाग आहे. त्यांनीच यापूर्वी केदारनाथ येथील आदि शंकराचार्यांचा 12 फूट उंचीचा पुतळा तयार केला होता. इंडिया गेटवरील अमर जवान ज्योती सरकारने राष्ट्रीय युद्ध स्मारकामध्ये स्थलांतरित केली. त्यानंतर येथे नेताजींचा 30 फूट उंचीचा भव्य पुतळा बसविण्याच्या योजनेवर काम सुरू झाले.
(हेही वाचा अवघ्या १०-१५ दिवसांत खेतवाडीतील १५-२० फुटांच्या गणेशमूर्ती कशा उभ्या केल्या?)
तीन वेळा तारीख बदलली
दरम्यानच्या काळात दुर्गापूजेनंतर नवरात्रीत या पुतळ्याचे अनावरण होणार होते. त्यानंतर नवीन तारीख आली त्यानुसार नेताजींनी सशस्त्र क्रांतीच्या माध्यमातून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी 1943 मध्ये ज्या दिवशी ‘आझाद हिंद सरकार’ आणि ’आझाद हिंद फौज’ स्थापन केली होती, त्या 21 सप्टेंबरच्या मुहूर्तावर या पुतळ्याचे अनावरण करण्याचे नंतर जाहीर करण्यात आले. आता 8 सप्टेंबरची तारीख निश्चित झाली आहे.
Join Our WhatsApp Community