राज्यात दिवसभरात २६६ कोरोना रुग्णांची नोंद

101

राज्यात मंगळवारी २६६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात २४१ रुग्णांना कोरोना उपचारातून बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. राज्यात आता १ हजार ५५१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत राज्यात बाधित रुग्णांची एकूण संख्या ७८ लाख ८१ हजार २३५ झाली आहे. तर एकूण ७७ लाख ३१ हजार ८२९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.१०% एवढे झाले आहे. तर मंगळवारी एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नाही. राज्यातील मृत्यूदर १.८७ टक्क्यांवर नोंदवला गेला आहे. आज पर्यंत तपासण्यात आलेल्या ८,०५,९३,७२४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,८१,२३५ (०९.७८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

 

( हेही वाचा : १९ मे रोजी संदीप देशपांडेंना अटक होणार? )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.