भारतातील कोरोना लसींनाही निष्प्रभ ठरवू शकतो ‘हा’ नवा व्हेरियंट?

122

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला आहे, असे वाटत असताना जगभरात कोरोनाच्या नव्या व्हायरसने पुन्हा थैमान घातले आहे. कोरोनाच्या B.1.1.529 या नव्या व्हायरसमुळे जगभरात पुन्हा काळजीचं वातावरण निर्माण झाले आहे. दक्षिण आफ्रिकेत मोठ्या प्रमाणात संसर्गाचं कारण ठरलेल्या या विषाणूने जगातील इतर देशांमध्येही आपले हात-पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. B.1.1.529 म्हणजे ओमीक्रॉन नावाच्या कोरोनाच्या नव्या कोरोना व्हायरस असे आहे. हा व्हायरस डेल्टापेक्षा अधिक घातक आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील महत्त्वाची वैद्यकीय संस्था एम्सने सतर्क केले असून गंभीर असा इशारा दिला आहे.

नव्या धोकादायक व्हेरियंटबाबत चिंता

शुक्रवारी एम्समधील कम्युनिटी मेडिकल सेंटरचे डॉ. संजय राय यांनी या नव्या धोकादायक व्हेरियंटबाबत चिंता व्यक्त केली आहे. यावेळी ते म्हणाले, “या व्हायरसच्या संसर्ग क्षमतेविषयी पूर्ण माहिती नसली तरी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. त्यामुळे कोरोना लसींमुळे शरीरात तयार झालेली कोरोना विरोधी रोगप्रतिकारक शक्तीलाही हा नवा व्हेरियंट भेदू शकतो. तसेच हा नवा व्हेरियंट भारतातील कोरोना लसींनाही निष्प्रभ ठरवू शकतो”

(हेही वाचा – सिरो सर्वेक्षण! ९० टक्क्यांहून अधिक ठाणेकरांमध्ये आढळल्या अँटीबॉडीज)

इस्राईलमध्ये आढळला हा नवा व्हेरिएंट 

नव्या व्हेरियंटने कोरोना लसींद्वारे नागरिकांना मिळालेली प्रतिकारशक्ती किंवा नैसर्गिक पद्धतीने तयार झालेली कोरोना विरोधी रोग प्रतिकारशक्ती भेदल्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा देखील तज्ज्ञांनी दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग आणि बोटस्वानानंतर आता कोरोनाचा B.1.1529 हा व्हेरिएंट इस्राईलपर्यंत पोहचला आहे. इस्राईलच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण आफ्रिकेत मोठ्या प्रमाणात संसर्गाला कारणीभूत ठरलेला अधिक धोकादायक कोरोना व्हेरिएंट इस्राईलमध्ये सापडला असून इस्राईलमध्ये नव्या व्हायरसचा संसर्ग झालेला रूग्ण मलावीमधून परतला होता. इतकेच नाही तर इतर देशांमधून परतलेल्या अन्य २ प्रवाशांमध्ये देखील या नव्या व्हेरिएंटचा संसर्ग आढळला असून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.