राज्यात कोरोनाचा तिसऱ्या दिवशीचा रेकॉर्ड काय? जाणून घ्या…

82

शुक्रवारी राज्यातील विविध भागांतून कोरोनाच्या नव्या नोंदीमुळे एकूण रुग्ण संख्या थेट चाळीस हजारांच्या पुढे सरकली. गुरुवारच्या नोंदीच्या तुलनेत शुक्रवारी चार हजाराने रुग्ण जास्त दिसून आले. शुक्रवारी थेट 40,925 नवे रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. मात्र नव्या वर्षात पहिल्यांदाच राज्यात ओमायक्रॉनचा नवा रुग्ण आढळला नाही.

सतत तीन दिवसांच्या हॅट्ट्रिक नोंदीमुळे राज्यात आता एक लाख एकेचाळीस हजार चारशे ब्याण्णव सक्रिय रुग्ण आहेत. तर कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून आतापर्यंत पासष्ठ लाख सत्तेचाळीस हजार चारशे दहा रुग्ण आतापर्यंत राज्यात दिसून आले आहेत. आज राज्यात वीस रुग्ण कोरोनामुळे मृत्यू पावले. तर चौदा हजार दोनशे छप्पन रुग्ण यशस्वी उपचारानंतर घरी परतले.

(हेही वाचा सलग दुस-या दिवशीही २० हजार नवीन कोरोनाबाधित रुग्ण)

मुंबईत नवीन रुग्ण संख्या २०,१८१

कोविड बाधित रुग्णांची संख्या सलग दुसऱ्या दिवशी पाच हजारांनी वाढल्यानंतर शुक्रवारी रुग्णांची संख्या गुरुवारपर्यंत २० हजारांपर्यंतच स्थिरावली. गुरुवारी जिथे २० हजार १८१ रुग्ण आढळून आले होते, तिथे शुक्रवारी सुमारे ८०० रुग्णांची भर पडत २० हजार ९७१ एवढे रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांपैकी १,३९५ रुग्णांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. यापैकी ८८ रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली गेली आहे. विशेष म्हणजे दिवसभरात साडेआठ हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर मृतांचा आकडा वाढलेला पहायला मिळत असून दिवसभरात ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पाच रुग्ण हे दीर्घकालिन आजारी होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.