अरबी समुद्रात केरळ किनारपट्टीलगत वादळाच्या निर्मितीचे संकेत असल्याचे भारतीय हवामान खात्याने मंगळवारी जाहीर केले. या वादळापासून महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धोका नसला तरीही दोन दिवस मच्छिमारांनी दक्षिण कोकणातील समुद्रात मच्छिमारासाठी जाऊ नये, असे आवाहन मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने केले आहे.
(हेही वाचा – 7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, 3 हप्त्यांत मिळणार DA थकबाकी)
मंदौस चक्रीवादळ शमल्यानंतर या वादळातील बाष्प अरबी समुद्रापर्यंत वाहून आले. या बाष्पामुळे रविवारपासून राज्यातील विविध भागांत शिडकावे पडत आहेत. सोमवारपासून राज्यातील विविध भागांत तीन ते पाच अंशाने वाढ झाली आहे. सध्या गारठवणा-या थंडीला ब्रेकच राहील, असे चित्र आहे.
दक्षिण कोकणानजीकच्या समुद्रात ताशी ४५ ते ५५ प्रती किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. वा-यांचा वेग थोडा वाढण्याचीही शक्यता आहे. याबाबत आम्ही माहिती देत राहू. दोन दिवस मच्छिमारांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील समुद्रात मच्छिमारांनी मच्छिमारासाठी जाऊ नये.
– सुनील कांबळे, उपसंचालक, मुंबई प्रादेशिक हवामान खाते
किनारपट्टीतील बहुतांश भागांत ढगाळ वातावरण दिसून येत आहे. मंगळवारी कर्नाटक आणि केरळदरम्यान कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रात जात आहे. येत्या दिवसांत कमी दाबाचा विकास होत त्याचे रुपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली. मंगळवारपासून रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील किनारपट्टीतील मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असे आवाहन मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने केले आहे.