सोशल मीडियावर सतत काही ना काही बदल होताना आपल्याला दिसत असतात. हल्लीच मिळालेल्या माहितीनुसार मेटाचे संस्थापक तसेच प्रमुख कार्यकारी अधिकारी मार्क्स झुकरबर्ग यांनी थ्रेड्सवर दोन नवे अपडेट लॉन्च केले आहेत.
कंपनीने आपले स्टेटमेंट देताना सांगितले की, थ्रेड्स लॉन्च केल्यानंतर इंस्टाग्राम टीम युजर्सच्या प्रतिक्रिया ऐकत आहेत. तसेच त्यांचे अॅप वापरताना युजर्सना आणखी चांगला अनुभव यावा म्हणून तसेच आणखी नवनव्या सुविधा देण्यासाठी ते शक्य तितक्या वेगाने काम करत आहेत. थ्रेड्स वर तुमच्या फिडमध्ये आता तुम्हाला दोन पर्यायांसोबत इतर प्रोफाइल सोबत पोस्ट पाहण्याची परवानगी मिळते.
‘फॉर यु’ नावाचा पहिला पर्याय आहे. या पर्यायामध्ये तुम्हाला ज्या पोस्ट्सना इतर युजर्स फॉलो करत आहेत किंवा ज्या अकाउंट्सच्या पोस्ट्सना तुम्ही लाईक केले असेल अशा अनेक पोस्ट्स पाहायला मिळतील. तसेच दुसऱ्या पर्यायाने नाव ‘फॉलोईंग’ असे आहे. यामध्ये तुम्हाला अशाच पोस्ट्स दिसतील ज्या अकाउंट्सना तुम्ही फॉलो करत असाल.
(हेही वाचा – ECS Module Case : पुण्यातील डॉक्टरला एनआयएकडून अटक, इसिस मॉड्युल प्रकरणातील पाचवी अटक)
भाषांतराच्या फीचरसोबत थ्रेड पोस्टचा अनुवाद करण्याचा पर्याय उपलब्ध असेल. ही सेटिंग पोस्ट करणाऱ्या आणि पोस्ट वाचणाऱ्या युजर्सच्या सेटिंग्सवर अवलंबून असेल. पोस्ट वाचणारी व्यक्ती जर इतर कोणत्या भाषेचा वापर अॅपमध्ये करत असेल तर दुसऱ्या युजरने पाठवलेली पोस्ट त्यांच्या भाषेत ट्रान्सलेटचे बटन दाबून वाचू शकतात. याव्यतिरिक्त युजर्सकडे फॉलो, कोट्स आणि रिपोस्ट्सना फिल्टर करण्याचाही पर्यायही उपलब्ध असेल. तसेच युजर्सच्या फॉलोअर्स लिस्टमध्ये बाजूला एक फॉलोचे बटन असेल. हे बटन क्लिक करून युजर्स आपल्याला फॉलो करणाऱ्या फॉलोअर्सना फॉलो बॅक करू शकतात.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community