मुंबईत कोरोनाचे गुरूवारी ३ हजार ६१० रुग्ण आढळून आले, त्यामुळे राज्यात दिवसेंदिवस कोरोना संकट वाढत चालले आहे. नववर्षाचे औचित्य साधत नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. मुंबईत नववर्षात उत्साहाचे वातावरण असते. या दरम्यान सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन होत नाही. म्हणूनच सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई पोलिसांनी नवीन नियमावली जारी केली आहे.
मुंबई पोलिसांची नियमावली
- जमावबंदी ७ जानेवारी ऐवजी १४ जानेवारी मध्यरात्रीपर्यंत वाढवण्यात आली आहे.
- बगीचे, समुद्र किनारे, मैदान, सार्वजनिक जागेवर ३१ डिसेंबर २०२१ पासून १४ जानेवारी २०२२ च्या मध्यरात्री पर्यंत कलम १४४ (जमावबंदीचा आदेश ) लागू करण्यात आले आहे.
- जमावबंदी आदेश सायंकाळी ५ ते पहाटे ५ वाजेपर्यंत जमावबंदी लागू राहील, या दरम्यान पाचपेक्षा जास्त नागरिक एकत्र आल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
- लग्न समारंभाला ५० व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी आहे, तर अंत्यविधीला २० जणांना परवानगी असणार आहे.
- सामाजिक, धार्मिक कार्यक्रम, राजकीय सभा, राजकीय कार्यक्रमामध्ये ५० पेक्षा अधिक जणांना उपस्थित राहता येणार नाही, ही नियमावली कोविड-१९ चा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेली आहे.
( हेही वाचा : मुंबईत किशोरवयीन मुलांचे लसीकरण ९ केंद्रात : १ जानेवारीपासून नोंदणी )
३१ डिसेंबरसाठी महाराष्ट्र सरकारचे नियम
नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ३१ डिसेंबरच्या रात्री मुंबईसह राज्यात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ठाकरे सरकारने रात्री उशिरा कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचा सुधारित आदेश जारी केला आहे. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, पर्यटन स्थळे, समुद्रकिनारे, मोकळे मैदान याठिकाणी कलम 144 लागू केले जाणार आहे. तसेच हॉटेल, बार-रेस्टॉरंटवर पालिकेची करडी नजर असणार आहे.
Join Our WhatsApp Community