New Labour Code : १ जुलैपासून नवे कामगार कायदे! खासगी कर्मचाऱ्यांच्या वार्षिक सुट्ट्यांमध्येही होणार मोठा बदल

131

केंद्र सरकारचे नवे कामगार कायदे ( new labour law) १ जुलै पासून लागू करणार आहे. नव्या कामगार कायद्यांनुसार कर्मचाऱ्यांचे पगार, त्यांचे पीएफ योगदान, कामाचे तास आणि सुट्ट्या यांमध्ये महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत. नवे नियम लागू झाल्यानंतर प्रामुख्याने कामाचे दिवस आणि तास यांमध्ये बदल होणार असून कर्मचाऱ्यांना ८ तासाऐवजी १२ तास काम करावे लागणार आहे. प्रत्येक राज्याला आपल्या सोयीनुसार यात बदल करता येणार आहे.

( हेही वाचा : १ जुलै पासून सरकारी कर्मचाऱ्यांना ३०० ऐवजी ४५० सुट्ट्या?)

वार्षिक सुट्ट्यांवर होणार परिणाम

कर्मचाऱ्यांना कामाचे तास यापेक्षाही रजा केव्हा मिळू शकतात, वार्षिक रजा किती, किती पेड लिव्ह मिळू शकतात याबद्दल उत्सुकता असते. नव्या कामगार कायद्यांनुसार रजेसाठी नियमावली करण्यात येणार आहे. तसेच उर्वरित सुट्ट्या पुढील वर्षाच्या सुट्ट्यामध्ये जोडले जाण्याचे आणि सुट्ट्यांचे कॅशिंगमध्ये रुपांतर करण्याचे नियम देखील बनवले जाणार आहेत.

सुट्टीचा लाभ घेण्यासाठी किमान पात्रता कालावधी १८० वरून २४० पर्यंत वाढवण्याचा विचार केला जात आहे. म्हणजेच नोकरी सुरू केल्यानंतर कर्मचाऱ्याला पहिली सुट्टी घेण्यासाठी किमान २४० दिवस काम करणे आवश्यक आहे.

पीएफ पगारात बदल

वार्षिक सुट्ट्यांसोबतच कर्मचाऱ्यांचे पगार आणि पीएफमध्ये बदल होणार असून कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार त्यांच्या ग्रॉस पगाराच्या ५० टक्के असणार आहे. याचा अर्थ पीएफमध्ये जमा होणारी रक्कम वाढणार असून खाजगी कर्मचाऱ्यांच्या खात्यात महिन्याच्या शेवटी जमा होणारा पगार कमी होऊ शकतो आणि निवृत्तीनंतर मिळणाऱ्या रकमेसोबत ग्रॅच्युइटी रकमेत वाढत होणार आहे.

( हेही वाचा : Pension Scheme : पेन्शनधारकांसाठी खुशखबर! SBI बॅंकेच्या सहकार्याने सरकार देणार नवी सुविधा)

या राज्यांमध्ये लवकरत लागू होणार नवे कामगार कायदे

उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, हरियाणा, झारखंड, पंजाब, मणिपूर, बिहार, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर या राज्यांनी कामगार कायद्याचा मसुदा तयार केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.