भायखळ्यातील जे. जे. समूह रुग्णालयात हृदयविकाराच्या उपचारांसाठी नवे मशीन दाखल झाले आहे. ही मशीन खास बायपास शस्त्रक्रियेसाठी वापरली जाणार आहे. आय.बी.पी. मशीन असे या नव्या मशीनचे नाव आहे. ओएनजीसी कंपनीच्या सीएसआर फंडातून ३३ लाखांची ही मशीन रोटरी क्लब ऑफ मुंबईच्यावतीने जेजे समूह रुग्णालयाला देण्यात आली आहे.
हृदय विकाराच्या उपचारांसाठी मशीनचे अनावरण
सोमवारी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालयाचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. रणजीत माणकेश्वर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय सुरासे, उरःशल्यचिकित्सा विभागाचे विभागप्रमुख व प्राध्यापक डॉ. मनोज जोशी, समाजसेवक दत्तात्रय विभुते यांच्या उपस्थितीत या मशीनचे अनावरण झाले. यावेळी रोटरी क्लब ऑफ मुंबईचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेंद्र अग्रवाल, ओएनजीसीचे अधिकारी किरण निकम उपस्थित होते.
( हेही वाचा : कोकणात धावली अगीनगाडी…; जन्माची तिच्या अद्भुत कहाणी )
जे.जे. समूह रुग्णालयात राज्य तसेच देशभरातून उपचारांसाठी रुग्ण येत असतात. हृदयविकाराच्या बायपास शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयात दहा लाखांचा दर आकारला जातो. मात्र जे. जे. रुग्णालयात ही शस्त्रक्रिया महात्मा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत सर्व आर्थिक गटांसाठी मोफत करण्यात येणार आहे, अशी माहिती जेजे रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली
Join Our WhatsApp Communityया मशीनमुळे हृदयाच्या बायपास शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या गरजू रुग्णांची संख्या वाढण्यास मदत होईल. रुग्णालयात दर वर्षाला हजारहून अधिक गरजू रुग्णांच्या शस्रक्रिया पार पाडल्या जातील.
– डॉ. पल्लवी सापळे, अधिष्ठाता, जेजे समूह रुग्णालय, भायखळा