कूपर रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

164

विलेपार्ले येथील आर. एन. कूपर हॉस्पिटल कॅम्पस येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन सोमवारी राज्याचे पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. भविष्यात सर्वोत्तम डॉक्टर्स, नर्सेस आणि वैद्यकीय कर्मचारी तयार होण्याबरोबरच पालिका रुग्णालयांतील रुग्णांच्या तुलनेत कमी असलेले डॉक्टरांचे प्रमाण वाढण्यास या महाविद्यालयामुळे मदत होईल, अशी आशा आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. मुंबईत ५ वैद्यकीय महाविद्यालये असणारी बृहन्मुंबई महानगरपालिका कदाचित देशातील एकमेव महानगरपालिका आहे, ही आपल्यासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे ठाकरे यावेळी म्हणाले.

( हेही वाचा : कोकणात काळ्या बिबट्या आहे पण… )

या महाविद्यालयामुळे उपनगरात वैद्यकीय शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणे, ही पालकमंत्री म्हणून माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या महाविद्यालयात मुंबईतील वैद्यकीय पायाभूत सुविधा अधिक मजबूत करणारे उत्कृष्ट डॉक्टर्स, नर्सेस व वैद्यकीय कर्मचारी निर्माण होतील, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. या कॉलेजध्ये एमबीबीएस, पीजीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि सर्वांगीण प्रगतीसाठी अद्ययावत साधने उपलब्ध असतील, असेही ते म्हणाले.

New Project 1 26

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या  इमारतीविषयी

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयासाठी नवीन इमारत बांधण्यात आली आहे. ही नवीन इमारत मुख्यत्वाने एमबीबीएस (बॅचलर ऑफ मेडिसीन ऍण्ड बॅचलर ऑफ सर्जरी) पदवी व पदव्युत्तर शिक्षणाकरीता उपयोगात येणार आहे. तळघर, तळमजला आणि त्यावर ५ मजले अशा स्वरुपाची या इमारतीची संरचना आहे. सुमारे ३६ हजार ३९७ चौरस मीटर (३ लाख ९१ हजार ७७५ चौरस फूट) इतक्या क्षेत्रफळाचे बांधकाम असलेल्या या इमारतीमध्ये तळमजला ते चौथ्या मजल्यापर्यंतचा वापर वैद्यकीय महाविद्यालयीन सेवांकरीता होणार आहे. पाचव्या मजल्यावर सर्व विभागप्रमुखांची कार्यालये असतील. यामध्ये तेरा विभागांची व्यवस्था राहणार आहे. तसेच तळघरामध्ये ५९ चारचाकी वाहने आणि ४९ लहान वाहन क्षमतेचे वाहनतळ उभारण्यात आले आहे. मध्यवर्ती अंगण, २४० आसन क्षमतेच्या चार वर्गखोल्या, ३०० आसन क्षमतेचे एक परीक्षा सभागृह, ५०० आसन क्षमतेचे एक बहुउद्देशीय सभागृह, प्रात्यक्षिक कक्ष, अभ्यागत कक्ष, ८०० चौरस मीटरची दोन ग्रंथालये, स्वयंपाकगृह, भोजनगृह, वातानुकूलन व्यवस्था, उद् वाहन इत्यादी सर्व व्यवस्था या इमारतीत उपलब्ध आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.