Veer Savarkar : अंदमान आणि राजबंदीवानांचे पुतळे

१८ जुलै २०२४ ला नव्याने बांधण्यात आलेल्या वीर सावरकर आंतराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं करण्यात आले.

58
फेब्रुवारी २०१२ मध्ये मुंबईतील दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं विमानतळ प्राधिकरणाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अर्ध पुतळा भेट देण्यात आला होता.

अंदमान.. हिंदुस्थानचे राष्ट्रीय तीर्थक्षेत्र- क्रांतितीर्थ.

सेल्युलर कारागृहाचा काराधीप, कर्दनकाळ डेव्हीड बॅरी हा स्वातंत्र्यवीर सावरकरांसमोर (Veer Savarkar) इतर राजबंदीवानांना अपमानित करीत असे. एकदा वीर सावरकर राजबंदीवानांना म्हणाले, “माझ्यासमोर तुम्हांस तो बंदीपाल अश्लील भाषा बोलला म्हणून तुम्ही मनात संकोच करू नका व धीर खचू देऊ नका. आज ते तुम्हांस भिकारडे म्हणत आहेत, उद्या मला म्हणतील. आज आपण अवश आहो. आज आपला या जगतात अपमान होईल पण असाही एक दिवस क्वचित येईल की, अंदमानच्या याच कारागारात राजबंदीवानांचे पुतळे उभारले जातील आणि येथे हिंदुस्थानाचे राजबंदीवान राहत असत म्हणून हजारो लोक यात्रेस लोटतील!” स्वातंत्र्यवीर सावरकरांचे शब्द केव्हाच सत्यात उतरले आहेत.

१९८३ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुंबईतील पार्ल्याच्या लोकमान्य टिळक सेवा संघ या संस्थेनं, गोविंद दत्तात्रय गोखले चॅरिटेबल ट्रस्टच्या सहयोगानं, सेल्युलर कारागृहासमोरील वीर सावरकर उद्यानात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा (Veer Savarkar) पहिला पुतळा उभारून त्यांना मानवंदना दिली. याच उद्यानात प्रातिनिधिक स्वरुपात इंदूभूषण राय, पंडित राम रक्खा, मोहन किशोर नामदास, बाबा भानसिंग, महावीर सिंग, मोहित मोईत्रा या हुतात्म्यांचे देखील पुतळे आहेत.

savarkar3

savarkar3 1

(हेही वाचा Swatantra veer Savarkar चित्रपटाने ‘इंडियन पॅनोरमा’ चा झाला शुभारंभ)

अंदमानातील वीर सावरकर आंतराष्ट्रीय विमानतळावर सावरकरांचा पुतळा नव्हता, केवळ एक जुने झालेले चित्र होते, हे लक्षात येताच फेब्रुवारी 2012 मध्ये मुंबईतील दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं विमानतळ प्राधिकरणाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा (Veer Savarkar) अर्ध पुतळा भेट देण्यात आला होता. तो आता नवीन विमानतळावर बसवण्यात आला आहे.

savarkar1

१८ जुलै २०२४ ला नव्याने बांधण्यात आलेल्या वीर सावरकर आंतराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं करण्यात आले. त्याचवेळी भारत शासनाच्या वतीनं विमानतळासमोरच उभारण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १८ फुटी पुतळ्याचं अनावरण हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं.

savarkar 7

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे शब्द खरे ठरले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांसहित काही राजबंदिवानांचे पुतळे अंदमानमध्ये उभारले गेले आहेत आणि ज्या राजबंदिवानांच्या रक्त आणि अश्रूंचं सिंचन सेल्युलर कारागृहाच्या भूमीला झालं आहे त्या भूमीला अभिवादन करण्यासाठी हजारोंच्या संख्येने भारतीय यात्रेकरू अंदमानला सतत येत असतात. (Veer Savarkar)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.