आता सगळे पासवर्ड लक्षात ठेवायची गरज नाही; गुगल, अ‍ॅपल आणि मायक्रोसाॅफ्ट कंपनीची मोठी घोषणा

154

आता सोशल नेटवर्कींचे जाळे एवढे पसरले आहे की, येणा-या प्रत्येक अ‍ॅपवर प्रत्येक जण आपले अकाऊंट उघडतात पण लाॅगइनसाठी प्रत्येकवेळी पासवर्डची आवश्यकता असते. पण हे सगळे पासवर्ड लक्षात ठेवणे खरं तर फार कठीण आहे. पण आता पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज पडणार नाही. कारण आता google, Apple आणि Microsoft या सर्व अकाऊंट आणि सुविधांमध्ये पासवर्डशिवाय लाॅगइन करता येणार आहे.

या यूझर्सना होणर फायदा

गुगल, अ‍ॅपल आणि मायक्रोसाॅफ्टच्या या नवीन बदलाचा वापर प्रत्येक उपकरण आणि ऑपरेटिंग सिस्टमचे यूजर्स करु शकतील. अ‍ॅंड्राॅइड, आयओएस, क्रोम- ओएस, क्रोम ब्राउझर, एज, सफारी आणि मॅक- ओएस सारख्या सर्व प्लॅटफाॅर्मचे यूर्जर्स या पासवर्डलेस ऑथेंटिकेशनचा लाभ घेऊ शकतात. हे नवीन फिचर स्मार्टफोन, डेस्कटाॅप, ब्राउझर डिव्हायसेस सर्वत्र वापरु शकता.

( हेही वाचा: राणा दाम्पत्याचा जामीन रद्द होणार? माध्यमांशी बोलण्यास मनाई असताना दिला बाईट )

2023 पासून सुरु होणार सुविधा 

तुमच्या अकाऊंटमध्ये साइन इन करण्यासाठी एक युनिक क्रिप्टोग्राफिक टोकन किंवा क्रेडेंशियन वापरावे लागेल. अशाप्रकारे, तुम्ही पासर्वडशिवाय खात्यात लाॅगइन करु शकाल. या नवीन फिचरमुळे तुम्हाला पासवर्ड लक्षात ठेवण्याच्या त्रासापासून सूटका होणार आहे. हॅकर्ससाठी अकाऊंट हॅक करणे अधिक कठीण होईल. गुगलने ही सुविधा 2023 पासून सुरु करण्यात येईल असेही सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.