कोरोना आणि त्याच्या नव नव्या व्हेरियंटने संपूर्ण जगाला हादरून टाकले आहे. कोरोनाच्या दूसऱ्या लाटेत देशाला डेल्टा व्हेरियंटने प्रभावित केलं. डेल्टातून देश सावरत असताना ओमायक्रॉन या व्हेरियंटने देशात धुमाकूळ घातला. या परिस्थितीत आता आणखी एक नवा व्हेरियंट समोर आल्याचे सांगितले जात आहे. या व्हेरियंटचे नाव डेल्टक्रॉन असे असून हे नवीन रूप आल्यानंतर तज्ज्ञांनी त्याबाबतची विशिष्ट माहिती मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, नवीन व्हेरियंट ओमिक्रॉन आणि डेल्टा मिळून बनले आहे.
जगात कोरोनाची चौथी लाट येणार?
ओमायक्रॉन हा जलद-संक्रमण करणारा व्हेरियंट मानला जात असताना, डेल्टा हा अत्यंत धोकादायक व्हेरियंट असून ज्याने दुसऱ्या लाटेत कहर केला आहे. या स्थितीत आढळलेला नवा डेल्टाक्रोन व्हेरियंटही धोकादायक असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामुळे देशात आणि जगात कोरोनाची चौथी लाट येऊ शकते, असेही सांगितले जात आहे.
(हेही वाचा -चिंता वाढली! मुंबईपेक्षाही ‘या’ जिल्ह्यात ओमायक्रॉनचा अधिक फैलाव )
या देशात आढळला नवा व्हेरियंट
सध्या, सायप्रसमधील एका संशोधकाने हा व्हेरियंट शोधला आहे. सायप्रस विद्यापीठातील जीवशास्त्राचे प्राध्यापक लिओनडिओस कोस्ट्रिक्स यांनी याचे नाव डेल्टाक्रॉन ठेवले. त्यात ओमिक्रॉन सारखी वैशिष्ट्ये आणि डेल्टा सारखी जीनोम आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सायप्रसमध्ये आतापर्यंत या नवीन व्हेरियंटचे 25 रुग्ण आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कॉस्ट्रिक्स यांनी सांगितले की, याक्षणी आम्ही पहिल्या दोन मुख्य व्हेरियंटपेक्षा ते अधिक धोकादायक आहे की नाही हे शोधत आहोत. या संशोधकांनी त्यांच्या अभ्यासाचे निकाल GSaid या आंतरराष्ट्रीय डेटा बेसला पाठवले आहेत जे संसर्ग डेटाचे परीक्षण करतात.
Join Our WhatsApp Community