इस्रायलमध्ये कोविडच्या ‘या’ नव्या व्हेरियंटचं थैमान, वाचा किती आहे जीवघेणा?

168

गेल्या दोन वर्षांपासून देशात कोरोनाचं संकट असून अद्याप कोरोनाचा कहर हा देशातून पूर्णतः नाहीसा झाला नाही. अशा परिस्थितीत इस्रायलमध्ये कोविडच्या नव्या व्हेरियंटने थैमान घातल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलमध्ये दोन लोकांना कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लागण झाल्याचे आढळून आले आहे. इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाच्या मते, तपासादरम्यान कोविडच्या नव्या व्हेरियंटबाबत माहिती मिळाली आहे. बेन गुरियन विमानतळावर आलेल्या दोन प्रवाशांच्या पीसीआर चाचणीत ओमिक्रॉन व्हेरियंटमधील BA.1 आणि BA.2 या दोन सब व्हेरियंटची निर्मिती झाल्याचे सांगितले जात आहे.

अशी आहेत नव्या व्हेरियंटची लक्षणं

इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, कोविडचा हा व्हेरियंट आश्चर्यकारक आहे. BA.1 आणि BA.2 एकत्रितपणे संक्रमित झालेल्या प्रवाशांना सौम्य ताप, डोकेदुखी आणि स्नायू दुखणे आहेत. याशिवाय त्यांच्यामध्ये अजून कोणतीही गंभीर लक्षणे आढळलेली नाहीत. इस्रायलचे एपिडेमिक रिस्पॉन्स चीफ सलमान जरका म्हणाले की, संसर्गाच्या नवीन प्रकरणांबद्दल काळजी करण्याची गरज नाही. ते असेही म्हणाले, सर्व व्हेरियंटबद्दल सर्वांना माहिती आहेच, परंतु आत्ता याची काळजी करण्याची गरज नाही.

(हेही वाचा – भारतीय रेल्वेचे खासगीकरण होणार की नाही? रेल्वे मंत्र्यांनी दिलं लोकसभेत उत्तर)

चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर

चीनमध्ये कोरोनाच्या या सब व्हेरियंटच्या BA.2 व्हेरियंटची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. संसर्गाची वाढती प्रकरणे रोखण्यासाठी अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत येथे कोरोना विषाणूचे पाच हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. ज्यामध्ये ओमिक्रॉन व्हेरियंटच्या सब-व्हेरियंट ‘स्टेल्थ’चा सर्वाधिक लोकांना त्रास होत असल्याचे आढळून आले आहे. जगात कोविडची चौथी लाट पाहता जागतिक आरोग्य संघटनेनेही इशारा दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.