मुंबईतील केईएम, शीव आणि नायर रुग्णालयांसह काही उपनगरीय रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रुग्णांना जिथे व्हिलचेअर आणि स्टेचर्स वेळेवर उपलब्ध होत नसतानाच दुसरीकडे महापालिकेच्या भगवती रुग्णालयात चक्क नवीन व्हिल चेअर्स आणि स्टेचर्स हे भंगारात काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. भगवती रुग्णालयाने काढलेल्या भंगारामध्ये नवीन व्हिल चेअर्स आणि स्ट्रेचर्सचा समावेश असून या सर्व वस्तूंचे पॅकींगही अद्याप तसेच असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे भंगारातील या नव्या वस्तूंच्या पॅक वस्तूंच्या समावेशामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
नवीन खरेदीच्या नावाखाली महापालिकेची तिजोरी लुटण्याचा डाव
मुंबई महापालिकेच्या भगवती रुग्णालयातील भंगारातील लोखंडी सामानाची विल्हेवाट लावण्यासंदर्भात १८ जुलै २०२२ रोजी निर्णय देत एआयएफएसओ टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला काम दिले. हे भंगारातील विक्रीची रक्कम २३ हजार एवढी असून त्यानुसार भंगारसामान संबंधित कंपनीला देण्यात आले. परंतु लोखंडी भंगार सामानांसह त्यामध्ये व्हिलचेअर्स आणि स्टेचर्स आदींचाही समावेश होता. या दोन्ही वस्तूंना गुंडाळण्यात आलेला पेपरही काढण्यात आलेला नाही. त्यामुळे भंगार सामानाच्या नावाखाली कंत्राटदाराला नवीन वस्तू देण्यामागील उद्देश का असा सवाल उपस्थित होत आहे.
मुंबईतील प्रमुख रुग्णालय आणि उपनगरीय रुग्णालयांमध्ये बऱ्याच वेळा रुग्णांच्या नातेवाईकांना व्हिल चेअर तसेच स्ट्रेचर्स उपलब्ध होत नाही. प्रमुख रुग्णालयांमध्ये याची कमतरता असताना दुसरीकडे अशा नवीन चेअर आणि स्ट्रेचर्स भंगारात टाकून नवीन खरेदीच्या नावाखाली महापालिकेची तिजोरी लुटण्याचा डाव आहे का असा सवाल उपस्थित होत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार सेना सरचिटणीस उत्तम सांडव महापालिकेच्या अन्य रुग्णालयांमध्ये व्हिल चेअर आणि स्ट्रेचर्सचा तुटवडा असताना या नव्या वस्तू भंगारात कशा काढल्या जातात असा सवाल उपस्थित केला आहे. त्यामुळे जर या जुन्या वस्तू आहेत, तर मग याला पॅकींग कसे असाही सवाल त्यांनी केला आहे.
( हेही वाचा : अतिवृष्टीग्रस्त भागातील १४ हजार ४८० नागरिकांचे स्थलांतर)
भगवती रुग्णालयाचे अधिक्षक डॉ शांताराम कावडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रुग्णालयातील लोखंडी सामान भंगारात काढण्यापूर्वी विद्युत व यांत्रिक विभागाची एनओसी घेतली जाते. तसेच टावो विजिलन्स यांचीही परवानगी घेतली जाते. या दोन्हींच्या मान्यतेनंतरच भंगालाचा लिलाव करून त्याची विक्री केली जाते,असे त्यांनी स्पष्ट केले. तर बऱ्याच व्हिल चेअर आणि स्ट्रेचर यांचे पॅकींग मटेरियल काढले नसेल तर परंतु ते वापरु शकत नसल्याने भंगारात काढले असेल असे त्यानी सांगितले. विशेष म्हणजे विभागांनी या व्हिल चेअर आणि स्ट्रेचर्स बाजुला काढून ठेवल्यानेच त्या भंगारात समावेश केल्या असाव्यात,असेही त्यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community