New Year 2024 : अंतराळ संशोधन क्षेत्राची २०२४ मधील उड्डाणे

इस्रोच्या असामान्य कामगिरीमुळे भारताचं अंतराळ क्षेत्रात प्राबल्य निर्माण झालंय. भारताची अंतराळ क्षेत्रातली अभिमानास्पद कामगिरी आणि या पुढील वाटचाल याचा लेखाद्वारे घेतलेला आढावा.

291
New Year 2024 : अंतराळ संशोधन क्षेत्राची २०२४ मधील उड्डाणे
New Year 2024 : अंतराळ संशोधन क्षेत्राची २०२४ मधील उड्डाणे
  • लीना बोकील

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ‘पीएसएलव्ही’च्या आणखी एका मोहिमेची यशस्वी सुरुवात करून इस्रोनं आपल्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. आंध्रप्रदेशमध्ये श्रीहरी कोटा येथून इथल्या सतीश धवन अवकाश प्रक्षेपण केंद्राच्या तळावरून सोमवारी, १ जानेवारीला पीएसएलव्ही सी-५८ एक्सपोसॅट (PSLV C-58 Exposat) हा उपग्रह (PSLV C-58) ६ अंशांच्या कलासह साडेसहाशे किलोमीटरवरच्या नियोजित कक्षेत स्थापित केला. हा उपग्रह अंतराळात नेमकं काय काम करणार आहे आणि त्याचा अवकाश संशोधन केंद्रासाठी किती उपयोग होणार आहे, एक्सपोसॅटचं काम कसं चालणार आहे? विशेष म्हणजे इस्रोच्या या असामान्य कामगिरीमुळे भारताचं अंतराळ क्षेत्रात प्राबल्य निर्माण झालंय. भारताची अंतराळ क्षेत्रातली अभिमानास्पद कामगिरी आणि या पुढील वाटचाल याचा लेखाद्वारे घेतलेला आढावा.

एक्स रे पोलरीमीटर सॅटलाइटचे प्रक्षेपण

एक्सपोसॅट यान अवकाशात यशस्वीरित्या प्रक्षेपित झाल्यानंतर एक्स-रे-पोलरीमीटर सॅटलाइट (उपग्रह) एक्सपोसॅट आता त्याच्या प्रवासाला लागलेला आहे. हे यान २००० किलोमीटरच्या आसपास जाईल आणि त्यानंतर त्याचा अभ्यास सुरू होईल. इस्रोने २०२३ मध्ये नॅशनल आणि इंटरनॅशनल लेव्हलची एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये एक्सरे पोलरीमीटरमध्ये अभ्यास करण्यासाठी अभ्यासक आणि शास्त्रज्ञांना आमंत्रित करण्यात आलं होतं. हे व्यासपीठ शास्त्रज्ञांना उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांना अनेक इनपुट्स मिळाले. त्यामुळेच ही मोहीम घडवण्यात आली.

मोहिमेसाठी वापरलेली यंत्रे भारतीय बनावटीची…

या मोहिमेकरिता वापरलेली यंत्रे भारतात बनवलेली असून संपूर्णत: स्वदेशी आहेत. इस्त्रोमध्येच अनेक यंत्रे तयार केली आहेत. या उपग्रहाच्या प्रक्षेपणाकरिता वापरलेली काही यंत्रे अमन इन्स्टिट्यूट, बँगलोर आणि इस्रोच्या अंतरिक्ष भवन येथेही तयार केलेली आहेत.

(हेही वाचा – Onion Export : इंडोनेशियाने भारताकडे केली ९ लाख मेट्रिक टन कांद्याची मागणी)

कृष्णविवर (BLACK HOLE)

कृष्णविवर हा विषय अतिशय गूढ आणि माणसामध्ये उत्सुकता निर्माण करणारा आहे. अवकाशात काय घडतं? याविषयी प्रत्येक व्यक्तीच्या मनात उत्सुकता असते. तिथे अर्थात अवकाशात वृद्ध झालेले तारे, तसेच त्यांच्यामध्ये काही फ्युजन रिअॅक्शन घडत असतात. त्या वाढत जाऊन तो एकदम हाय एनर्जी फिनॉमिनल होतो. त्याचं वजन वाढतं, तसेच गुरुत्वाकर्षण कॉन्सन्ट्रेशन वाढतं. या ताऱ्यांना डायिंग स्टार (Dying Star)असं म्हणतात. या ताऱ्यांचा अंत जवळ आलेला असतो. अशा न्यूट्रॉन्स तार आणि ब्लॅक होल्स यांच्या अभ्यासासाठी ‘एक्सपोसॅट’ (XPoSat) आहे. इस्रोची ही या प्रकारची पहिली मोहीम आहे. यापूर्वी फक्त नासाने या प्रकारची एक मोहीम तयार केली होती.

‘पीएसएलव्ही सी-५८ एक्सपोसॅट’ मोहीम भारतासाठी महत्वाची का ?

अंतराळात हे यान नेऊन ठेवलं की, ही एक प्रकारची दुर्बिणच आहे. त्यामुळे जमिनीवर किंवा पृथ्वीवर ठेवून निरीक्षण करतो, त्या वेळी अतिशय अडथळे येतात. तेव्हा टेलिस्कोप किंवा एक्स्पोसॅट हे अंतराळात गेलं की, तिथे ते पृथ्वीभोवती फिरत राहतं, पण त्याच वेळी तेथील प्रकाशाचा अभ्यास करून ते विविध माहिती गोळा करून त्याचा विश्लेषणाद्वारे अभ्यास करतं. त्यामुळे भारतासाठी (PSLV C-58 Exposat) पीएसएलव्ही सी-५८ एक्सपोसॅट ही मोहीम अतिशय महत्त्वाची आहे. नासानंतर भारताचा या मोहिमेत दुसरा क्रमांक लागतो. कृष्णविवर, न्यूट्रॉन स्टार (Neutron star), अॅक्टिव्ह गॅलेक्टिक न्यूक्लिअस वेव्ह… या गोष्टींचा अभ्यास आतापर्यंत कोणीही केला नव्हता. त्यामुळे रमण रिसर्च इन्स्टिट्युटचे शास्त्रज्ञ आणि इस्रोचे शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांनी मिळून हे तयार केलं आहे.

२०२४ हे वर्ष अंतराळाकरिता वैशिष्ट्यपूर्ण का ?

२०२४ हे वर्ष स्पेस टेक्नॉलॉजी आणि खगोलशास्त्र क्षेत्रासाठी महत्त्वाचं ठरणार आहे, कारण अनेक स्पेस एजन्सीद्वारे मोठ्या मोहिमा राबवल्या जाणार आहेत. यामध्ये नासाचे मानवाला पुन्हा चंद्रावर नेण्याचे नियोजन आहे, कारण ५ दशकं होऊन गेले, त्यानंतर चंद्रावर माणूस परत गेलेलाच नाही, त्याकरिता ‘नासा’चे प्रयत्न सुरु आहेत.

(लेखिका अंतराळशास्त्र विषयाच्या शिक्षिका आणि खगोलशास्त्र विषयाच्या अभ्यासक, संशोधक आहेत.)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.