भारतात कोरोनाची तिसरी लाट येणार नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे. पण, आता भारतासाठी चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. जगभरात कोरोनाचे नवीन व्हेरिएंट सापडत आहेत. तसेच, जगभरात कोरोनाची परिस्थितीही नियंत्रणाबाहेर गेली आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्याने, राज्यपालांनी आणीबाणी घोषित केली आहे. परिस्थिती पाहता राज्यपालांनी ‘आपत्ती आणीबाणी’ जाहीर केली आहे. कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढले आणि रूग्णालयात रुग्णांची संख्याही वाढल्याने राज्यपालांनी राज्यात ‘आपत्ती आणीबाणी’ घोषित केली आहे. “न्यूयॉर्क राज्यातील आपत्ती आणीबाणीची घोषणा” असं राज्यपालांच्या आदेशाचं शीर्षक आहे.
15 जानेवारीपर्यंत आणीबाणी लागू
“मी, कॅथी हॉचुल, न्यूयॉर्क राज्याचा राज्यपाल, राज्यघटनेने आणि न्यूयॉर्क राज्याच्या कायद्यांद्वारे मला दिलेल्या अधिकारांमुळे, कलम 2-बी च्या कलम 28 नुसार कार्यकारी कायदा, याच्या अंतर्गत मला असे आढळले आहे की, न्यूयॉर्क राज्यातील एक आपत्ती ज्याला स्थानिक सरकारे पुरेसा प्रतिसाद देऊ शकत नाहीत. त्यामुळे मी 15 जानेवारी 2022 पर्यंत संपूर्ण न्यूयॉर्क राज्यात आपत्ती आणीबाणी घोषित करत आहे.” असं न्यूयाॅर्क राज्याचे राज्यपाल कॅथी हॅाचुल यांनी आपल्या आदेशात म्हंटलं आहे.
न्यूयॉर्कमधील परिस्थिती चिंताजनक
विशेष म्हणजे अमेरिकेतील न्यूयॉर्कला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. गेल्या 24 तासात येथे 5 हजार 785 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. न्यूयॉर्क राज्यात कोरोनाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत सुमारे 58 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण २८ लाख रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी २३.२६ लाख रुग्ण बरे झाले आहेत, तर ४ लाखांहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यभर आणीबाणी
मध्यंतरी एक काळ असा होता की न्यूयाॅर्क राज्यातील कोरोना विषाणूची परिस्थिती नियंत्रणात होती, मात्र आता पुन्हा कोरोना विषाणूच्या संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत, मोठ्या संख्येने रूग्ण रूग्णालयात दाखल होत आहेत. ही परिस्थिती पाहता राज्यपाल कॅथी हॉचुल यांनी संपूर्ण राज्यात आणीबाणी लागू केली आहे.
(हेही वाचा : अर्जुन खोतकरांच्या घरी मध्यरात्रीपर्यंत ईडीचे छापे )
Join Our WhatsApp Community