NH8, NH13; असे क्रमांक राष्ट्रीय महामार्गांना का दिले जातात ?

208

राष्ट्रीय महामार्गांचे जाळे भारतभर ९७,९११ कि.मी. पसरलेले आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची स्थापना १९८८ साली करण्यात आली. हे प्राधिकरण राष्ट्रीय महामार्गांच्या विकास, बांधकाम तसेच देखभालीचे काम करते. भारतातील रस्त्यांचे जाळे हे जगातील दुस-या क्रमांकाचे जाळे आहे. अनेकदा आपल्याला महामार्गांवर NH हे सांकेतिक चिन्हे दिसते. NH म्हणजे National Highway म्हणजे राष्ट्रीय महामार्ग होय.

असे दिले जातात महामार्गांना क्रमांक 

  • सर्व उत्तर- दक्षिण दिशेच्या महामार्गांना सम संख्या क्रमांक दिला जातो.
  • उदा. NH 8: दिल्ली ते मुंबई आणि सर्व पूर्व- पश्चिम दिशेच्या महामार्गांना विषम संख्या क्रमांक दिला जातो.
  • उदा. NH 13: तवांग ते आसाम
  • सर्व प्रमुख राष्ट्रीय महामार्गांसाठी एक अंकी किंवा दोन अंकी संख्या वापरली जाते.
  • जसेजसे पूर्वेकडून पश्चिमेकडे जातो, तसेतसे उत्तर-दक्षिण राष्ट्रीय महामार्गांचे क्रमांक मोठे होत जातात.
  • त्याचप्रमाणे, जसेजसे आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे जातो तसेतसे पूर्व- पश्चिम राष्ट्रीय महामार्गांचे क्रमांक मोठे होत जातात. म्हणजेच मध्य भारतात किंवा दक्षिण भारतात असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक हा उत्तर भारतातील महामार्गांच्या क्रमांकापेक्षा मोठा असेल.

New Project 2022 06 21T175243.866

कोणता रस्ता राष्ट्रीय महामार्ग होतो आणि कसा?

जर एखाद्या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा द्यायचा असेल, तर त्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकार केंद्र सरकारला पाठवते. हा प्रस्ताव केंद्रीय परिवहन मंत्रालय आणि महामार्ग योजना आयोगाकडे पाठवला जातो. यावर केंद्रीय मंत्रीमंडळ निर्णय घेऊन मंजूरी देते. त्यानंतर राष्ट्रीय राजपत्रातून याबाबत अधिसूचना प्रकाशित केली जाते.

( हेही वाचा: Smartphone मधून चुकून फोटो delete झाला? या स्टेप्स फॉलो करत करा रिकव्हर )

New Project 2022 06 21T181603.367

हा आहे भारतातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग

भारतातील सर्वात लांब महामार्ग राष्ट्रीय महामार्ग 7 (NH-44) आहे. हा महामार्ग जम्मू- काश्मीरच्या श्रीनगर शहराला भारताच्या दक्षिण भागाशी जोडतो. हा रस्ता तामिळनाडूच्या कन्याकुमारी शहराला श्रीनगरशी जोडतो. याची लांबी 3 हजार 745 किमी आहे. सर्वात छोटा राष्ट्रीय महामार्ग 44A हा आहे. हा महामार्ग कोचीन ते वेलिंग्टन दरम्यान असून त्याची लांबी 6 किलोमीटर आहे.

 

NH44

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.