बांगलादेशी दहशतवाद्याला पश्चिम बंगालमधून अटक

या दहशतवाद्याचे अल-कायदा आणि हरकत-उल-जिहाद अल-इस्लामी (HuJI) शी संबंध असण्याची शक्यता

79

पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) मोठे यश मिळाले आहे. एनआयएने पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातून जमात-उल-मुजाहिदीन बांगलादेशच्या एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएच्या पथकाने मंगळवारी सुभाषग्राम परिसरात शोध मोहीम सुरू केली आणि बांगलादेशी नागरिकाला अटक केली. त्याच्याकडून बनावट मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड जप्त करण्यात आले आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्याची चौकशी सुरू आहे.

एनआयएच्या पथकाला यश

हा संशयित भारतात कधी आणि कसा घुसला याचा तपास सुरू आहे. हा दहशतवादी, ज्याचे नाव अद्याप उघड झाले नाही, तो या वर्षी जुलैमध्ये पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आलेल्या चार जमात-उल-मुजाहिदीन दहशतवाद्यांचा जवळचा सहकारी असल्याचे समजते, अशी माहिती सूत्रांनी दिली. एनआयएच्या पथकाने मंगळवारी या दहशतवाद्याला अटक केली आहे. त्यामुळे एनआयएच्या पथकाला मोठे यश आल्याचे म्हटले जात आहे.

(हेही वाचा- वाझेचे ‘नंबर १’ कोण? परमबीर की देशमुख?)

अल-कायदाशी संबंध असण्याची शक्यता

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवाद्याचे अल-कायदा आणि हरकत-उल-जिहाद अल-इस्लामी (HuJI) शी संबंध असण्याची शक्यता आहे. ते पश्चिम बंगालमध्ये दहशतवादी मॉड्यूल तयार करत असल्याचा संशय आहे. गेल्या काही वर्षांत पश्चिम बंगालमध्ये भारतीयांसह जमात-उल-मुजाहिदीनच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. जमात-उल-मुजाहिदीन, ज्याने २०१६ मध्ये ढाका येथील एका लोकप्रिय कॅफेवर दहशतवादी हल्ला केला होता ज्यामध्ये १७ परदेशी लोकांसह २२ लोक मारले गेले होते, जे भारतात आपले वास्तव्य वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत, एनआयएने २०१९ मध्ये म्हटले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.