NIA-ATS ची राज्यात मध्यरात्री छापेमारी; सोलापूर-औरंगाबादमधून PFI चे कार्यकर्ते ताब्यात

97

दहशतवाद्यांशी संबंधित आरोपांबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने सोमवारी मध्यरात्री मोठी कारवाई केली आहे. औरंगाबाद आणि सोलापूरमधून पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना एटीएस आणि एनआयएने ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वीच पीएफआयच्या कार्यालयांवर देशभरात छापेमारी झाली होती. जवळपास 100 जणांना अटकही करण्यात आली होती. सोमवारी मध्यरात्री तपास यंत्रणांनी पुन्हा एकदा कारवाई केली आहे.

औरंगाबादमध्ये कारवाई

औरंगाबाद एटीएस आणि पोलिसांनी मोठी कारवाई करत पीएफआयचे आणखी 13 ते 14 कार्यकर्ते ताब्यात घेतले. एकाच वेळी पीएफआयच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. औरंगाबाद पोलीस आणि एटीएसकडून रात्रभर छापमेमारी सुरु होती.

( हेही वाचा: ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’; एकनाथ शिंदे मोदींच्या मार्गावर? )

सोलापूरातून एकजण ताब्यात

सोलापूरमधूनही PFI विरोधात एनआयएने कारवाई केली आहे. सोलापूरमधून NIA च्या पथकाने ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्याला आपल्यासोबत चौकशीसाठी दिल्लीला नेले असल्याची माहिती आहे.

पीएफआय या संघटनेवर काय आरोप?

पीएफआय ही संघटना देशविरोधी कारवाया करत असल्याचा आरोप तपास यंत्रणांनी केला आहे. 2047 पर्यंत भारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्याचे त्यांचे उद्धिष्ट असल्याचा दावा तपास अधिका-यांनी केला. पीएफआयकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपच्या पदाधिका-यांच्या हत्येचा कट आखला असल्याचेही अधिका-यांनी म्हटले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.