पुण्यातील कोंढवा परिसरात अलीकडेच पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यालयावर NIA, ATS कडून छापेमारी करण्यात आली होती. या कारवाईनंतर मंगळवारी पुन्हा कोंढवा परिसरात तपास यंत्रणांमार्फत छापा टाकण्यात आला आहे. याप्रकरणी आता आणखी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. औरंगाबाद, सोलापूरनंतर पुण्यातही राष्ट्रीय तपास यंत्रणेने मोठी कारवाई केली आहे.
देशाहिताच्या विरोधात कृत्य केल्याप्रकरणी नाशिक येथील पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या काही सदस्यांवर गुन्हा दाखल केला होता. यानंतर 22 सप्टेंबरला पुण्यातील कोंढवा परिसरात दहशतवाद विरोधी पथकाने पीएफआय संघटनेच्या कार्यालयावर छापा टाकला. या कारवाईमध्ये पीएफआय संघटनेचे माजी राज्य सरचिटणीस रझी खान आणि अब्दुल कय्युम शेख या दोघांना अधिका-यांनी ताब्यात घेतले होते. त्यावेळी दोघांकडून काही साहित्यही जप्त केले होते. या कारवाईनंतर केंद्र सरकारच्या निषेधार्थ पीएफआय संघटनेकडून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. मात्र, यावेळी काही आंदोलनकर्त्यांनी देशविरोधी घोषणाबाजी केली. याप्रकरणी पुणे पोलिसांकडून कारवाई सुरु आहे.
( हेही वाचा: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची ‘सर्वोच्च’ सुनावणीः असा आहे शिंदे गटाचा न्यायालयातील युक्तिवाद )
Join Our WhatsApp Community