NIA-ATS raid on PFI: देशभरात एनआयएकडून 8 राज्यांत 25 ठिकाणी छापेमारी

118

नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) पु्न्हा एकदा अॅक्शनमोडमध्ये आली असून, देशभरात कारवाईचा सपाटा सुरु झाला आहे. देशभरात पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ठिकाणांवर छापेमारीची दुसरी फेरी सुरु आहे. एनआयएसह इतर यंत्रणांनी पुन्हा एकदा देशभरातील पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले आहेत.

एनआयएने काही दिवसांपूर्वी संपूर्ण देशभरातील पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ठिकाणांवर छापेमारी केली होती. या कारवाई दरम्यान अनेकांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर करण्यात आलेलल्या चौकशीत अनेक गोष्टी समोर आल्या होत्या. आता याच आधारे राज्यांतील पोलीसांच्या मदतीने पुन्हा एकदा एनआयएने धाडसत्र सुरु केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 8 राज्यांमध्ये पीएफआयच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात येत आहेत. राज्यातून औंरगाबादमधून 12 जणांना, सोलापूर 1, ठाण्यातून 4 तर कल्याण भिवंडीमधून प्रत्येकी 1 संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

( हेही वाचा: ‘प्राध्यापकांचे पगार आम्ही देऊ, तुम्ही महाविद्यालयांची फी कमी करा’, उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांचे आवाहन )

कर्नाटकातून पीएफआय अध्यक्षाला अटक 

कर्नाटक पोलिसांनी मंगळवारी सकाळी जिल्ह्यातील पीएफआय अध्यक्ष आणि एसडीपीआय सचिवाला अटक केली आहे. पीएफआयचे जिल्हाध्यक्ष अब्दुल करीम आणि एसडीपीआयचे सचिव शेख मस्कसूद यांना अटक करण्यात आली आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारी म्हणून अटक करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.