NIA ची कारवाई! दिल्लीसह अनेक राज्यात छापेमारी; दहशतवाद्यांचे अंडरवर्ल्डशी असलेले कनेक्शन उघड

108

गँगस्टर-टेरर फंडिंग प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) दिल्ली-NCR, राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये एकूण 20 ठिकाणी छापे टाकले आहेत. यावेळी दहशतवाद्यांचे अंडरवर्ल्डशी असलेले कनेक्शनही उघड झाले आहे. लॉरेन्स बिश्नोई, नीरज बवाना, टिल्लू ताजपुरिया यांच्यासह सहा गुंडांची चौकशी केल्यानंतर एनआयएने ही कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या सर्व गुंडांचे कनेक्शन परदेशातही जोडले गेले आहेत. लॉरेन्स बिश्नोई आणि नीरज बवाना यांच्या चौकशीत भारतात लॉरेन्स बिश्नोई आणि बवाना गँगच्या नावाने टेरर फंडिंग केले जात असल्याचेही समोर आले आहे.

(हेही वाचा – iNCOVACC: जगातील पहिल्या नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या कोविड लसीला भारत बायोटेककडून मंजुरी)

असे सांगितले जात आहे की, भारतात आणि परदेशातील दहशतवादी, गँगस्टर्सआणि अंमली पदार्थांचे तस्कर यांच्यातील वाढत्या संबंधाचा पर्दाफाश करण्याच्या उद्देशाने, एनआयएने दिल्लीसह 4 राज्यांतील सहाहून अधिक जिल्ह्यांमध्ये छापे टाकले आहेत. गँगस्टर्सशी निगडीत निवासी आणि इतर ठिकाणी एनआयएचे छापे टाकले जात आहेत. यासह या गँगस्टर्सचे इतर देशांमध्येही संपर्क असून लॉरेन्स बिष्णोई आणि बावना गँगच्या नावे भारतात दहशतवादासाठी मोठ्या प्रमाणात निधी पुरवला जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

याप्रकरणी एनआयएचा हा तिसरा छापा असून यापूर्वी 102 ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. एनआयएने सप्टेंबरमध्येही छापे टाकले होते. त्यावेळी दिल्ली-एनसीआर, हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि पश्चिम आणि उत्तर प्रदेशसह एकूण 60 ठिकाणी छापे टाकण्यात आले. नीरज बवाना, लॉरेन्स बिश्नोई आणि टिल्लू ताजपुरिया यांच्यासह इतर गुंड टार्गेट किलिंग करतात, अशी माहिती एनआयएला मिळाली होती. सोशल मीडियावर हे लोक तरुणांना चुकीच्या मार्गावर जाण्यास प्रवृत्त करतात. याशिवाय त्यांच्या गुन्ह्यांचे आणि टोळी युद्धाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून टोळीचे म्होरके स्वत:ला रॉबिन हूड म्हणवून घेतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.