ATS ची मोठी कारवाई! मालेगाव शहरातून PFI चा कार्यकर्ता ताब्यात

161

देशाच्या इतर भागांप्रमाणेच महाराष्ट्रातही आज गुरुवारी सुमारे 20 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. मुंबई, नवी मुंबई, भिवंडी आणि पुण्यातील कोंढवा भागात इस्लामिक दहशतवादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) कार्यकर्त्यांवर हे छापे टाकण्यात आले आहेत. एनआयए, ईडी आणि एटीएसच्या पथकाने हे छापे टाकले आहेत. या छाप्यांमध्ये राज्यभरातून सुमारे 20 जणांना अटक करण्यात आली आहे. अशातच मालेगाव शहरातून देखील एटीएसने मोठी कारवाई करत पीएफआयच्या एका कार्यकर्त्यास ताब्यात घेण्यात आले आहे.

(हेही वाचा – ‘आम्हाला जमीन दाखवाल तर तुम्हाला असमान दाखवू’, उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात)

टेरर फंडिंग प्रकरणी राज्यभरात ही छापेमारी टाकण्यात आले आहे. तर NIA ने नेरुळ येथील PFI कार्यालयावर मध्यरात्री 3 वाजता छापा टाकला. तसेच पुण्यातील कारवाईत दोघांना अटक करण्यात आली. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे कार्यकर्ते अब्दुल कय्याम शेख आणि रझा खान यांना अटक करण्यात आली आहे. यासह मालेगाव येथून एकाला एटीएसने अटकही केली आहे. सैफुर रहमान असे या व्यक्तीचे नाव असून मौलाना सैफुर रहमान हा PFI चा नाशिक जिल्हा अध्यक्ष असून ATS ने औरंगाबाद येथून चौघांना चौकशीसाठी अटक केली आहे.

दरम्यान, मालेगावमध्ये ईडी आणि एटीएसचे छापे टाकण्यात आले असून यावेळी एकाला अटक करण्यात आली आहे. तर एनआयएच्या टीमने राज्यभरात अनेक मुस्लिम संघटना असलेल्या पॉप्युलर फंड इंडियावर रात्री 3 वाजता छापेमारी सुरू करण्यात आली. यामध्ये मालेगावच्या एका व्यक्तीचा समावेश आहे. मुस्लिम संघटना पॉप्युलर फंड ऑफ इंडिया या संघटनेकडून अनेक संशयास्पद घटनांचा धोका असल्याचा अलर्ट आल्यानतंर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.