टेरर फंडिंगप्रकरणी महाराष्ट्रात 20 ठिकाणी NIA चे छापे; पुणे,नवी मुंबई, भिवंडीत धाडी

133

देशभरात केंद्रीय तपास यंत्रणेकडून छापेमारी सुरु आहे. टेरर फंडिग प्रकरणात ही कारवाई सुरु आहे. या संदर्भात NIA ने कारवाई करत 10 राज्यांमध्ये छापेमारी केली आहे. महाराष्ट्रातदेखील 20 ठिकाणी NIA ने छापे मारले आहेत. यात पुणे, मुंबई,  नवी मुंबई तसेच भिवंडीतही धाडसत्र सुरु आहे. पीएफआयशी संबंधित कार्यालये आणि व्यक्ती यांच्यावर छापेमारीचे सत्र सुरु आहे.

पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या पुण्यातील कोंढवा भागातील मुख्य कार्यालयावर एनआयए, एटीएस आणि इतरही काही तपास यंत्रणांनी छापे टाकले आहेत. या छाप्यात पीएसआयच्या कार्यालयातील काही साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर नाशिकमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांबद्दल काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पीएसआयचे महाराष्ट्र मुख्य कार्यालय पुण्यातील कोंढवा भागात आहे. क्यूम शेख आणि रजी अहमद खान या दोघांना अटक करण्यात आले असून त्या दोघांना घेऊन पथक नाशिकला रवाना झाले आहे.

( हेही वाचा: ‘मोदींना फाशीची शिक्षा मिळावी म्हणून रचला कट’; तिस्ता सेटलवाड यांच्यावर गंभीर आरोप )

तसेच, महाराष्ट्रातून 16 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.  पीएफआयशी संबंधित नेरुळ, पुण्याच्या कोंढावा भागात, नवी मुंबई, नाशिक, बीड या ठिकाणी ईडी आणि एनआयएने छापे मारले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.