राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIA ने मंगळवारी सकाळी आठ राज्यांमध्ये 70 ठिकाणी छापे टाकले. गॅंगस्टर लाॅरेन्स आणि त्याच्या निकटवर्तीयांच्या अड्ड्यांवर हे छापे टाकण्यात आले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, एनआयएने राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, चंदीगढ, मध्य प्रदेश, गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये एकाच वेळी कारवाई केली आहे. राजस्थानमध्ये छापेमारी करताना गॅंगस्टर लाॅरेन्सचे पाकिस्तान कनेक्शनही सापडले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, टेरर फंडिंगमध्ये लाॅरेन्स आणि त्याचे सिंडिकेट वेगवेगळ्या राज्यांमध्ये पसरल्याचे पुरावे मिळाल्यानंतर तापस यंत्रणा ही कारवाई करत आहे. सिद्धू मूसेवाला हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या लाॅरेन्स आणि नीरज बवाना यांनी चौकशीदरम्यान शस्त्र पुरवठादार टोळी आणि दहशतवादी फंडिंगची कबुली दिली. एनआयएला छापेमारीत अनेक ठिकाणी शस्त्रे सापडल्याचेही वृत्त आहे.
( हेही वाचा: ठाकरे गटाच्या याचिकेवर आता 22 फेब्रुवारीला होणार सुनावणी )
….म्हणून अनेक राज्यांमध्ये छापेमारी
NIA ने राजस्थानच्या अनेक जिल्ह्यांमध्ये छापे टाकले आहेत. त्यात जोधपूर, सीकर, चुरु, झुंझुनूचा समावेश आहे. अलीकडेच लाॅरेन्स बिश्नोईची जयपूर पोलिसांनी चौकशीही केली होती. लाॅरेन्सचे पाक कनेक्शन आणि लाॅरेन्सच्या गुंडांकडून होणारी शस्त्रास्त्रांची तस्करी पाहता एनआयएचे पथक राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये छापेमारी सुरु आहे.