NIA Raids in Mumbai: ‘डी कंपनी’चा निकटवर्तीय अजय गोसलिया NIA च्या ताब्यात

एनआयएने सोमवारी सकाळपासून मुंबई ठाण्यातील २० ठिकाणी छापेमारी करून शकीलचा मेहुणा सलीम फ्रूट, माहीम दर्ग्याचे विश्वस्त खंडवानी, ९३च्या स्फोटातील निर्दोष सुटलेला कय्यूम कुरेशी, आणि दाऊदचे हवाला रॅकेट सांभाळणारा बुकी तसेच बांधकाम व्यवसायिक अजय गोसालीया उर्फ गंडा यांच्या घरी छापेमारी करून त्यालादेखील ताब्यात घेण्यात आले आहे.

चौकशीसाठी गोसालिया ताब्यात

अजय गोसालीया उर्फ गंडा हा  बडा क्रिकेट बुकी असून, तो दाऊदचे हवाला रॅकेट चालवत होता अशी माहिती समोर येत आहे. एनआयएने सोमवारी इतर ठिकाणच्या छाप्यासह गोसालीया याच्या बोरिवली येथील घरी छापेमारी करून काही महत्वाचे कागदपत्रांसह त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
ऑगस्ट २०१३ साली गोसालीया याच्यावर मालाड येथील इन्फिनिटी मॉलच्या बाहेर गोळीबार करण्यात आला होता. त्यात अजय गोसालीया जखमी झाला होता. हा गोळीबार छोटा राजन टोळीने केल्याचे समोर आले होते. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी राजन टोळीचे शार्प शूटर सह सतीश कालिया यालादेखील अटक करण्यात आली होती. या गुन्हयात छोटा राजनदेखील आरोपी होता. मार्च २०२१मध्ये छोटा राजनला इतर सहआरोपींसह न्यायालयाने दोषी ठरवले होते. त्यांना १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षाही झाली होती.  राजनला ५ लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here