मुंबईत 29 ठिकाणांवर NIA ची छापेमारी; माहिम दर्ग्याचा ट्रस्टी सोहेल खंडवानी आणि सलीम फ्रूट ताब्यात

सध्या ईडीच्या अटकेत असलेले अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा साथीदार आणि मुंबईतील माहिम, हाजी अली दर्ग्याचे विश्वस्त सुहेल खंडवाणी तसेच, ग्रॅंटरोड भागातून छोटा शकीलचा साडू सलीम फ्रूट ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबईत सकाळपासून एनआयएची छापेमारी सुरु आहे. दाऊदशी संबंधित संशयावरुन तब्बल 29 ठिकाणी एनआयएने छापेमारी केली आहे. आतार्यंत पोलिसांनी काही नागरिकांनाही अटक केली आहे. नागपाडा, गोरोगाव, मुंब्रा, बोरिवली, सांताक्रूझ, भेंडी बाजारत छापे टाकण्यात आले आहेत.

आतापर्यंत 3 जण ताब्यात

NIAने छापे मारलेल्यांपैकी अनेक जण हे मंत्री नवाब मलिक यांच्याशी संबंधित असल्याची माहिती समोर येत आहे. या छापेमारीतून नवाब मलिक यांना घेरण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे बोलले जात आहे. आतापर्यंत छोटा शकीलचा साडू सलीम फ्रूट, माहिममधून सोहेल खंडवानी आणि कय्यूम नावाच्या व्यवसायिकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. वांद्र्यामध्ये NIA ने मुनीरा प्लंबर नावाच्या व्यवसायिकावरही छापा मारल्याचे समोर आले आहे. मुनिरा यांनी ही मालमत्ता हसिना पारकर यांच्या माध्यमातून  विकत घेतल्याची बातमी आहे.

सलीम फ्रूटची कुंडली

सलीम फ्रूट हा छोट्या शकीलचा साडू आहे. पीएमएलए अंतर्गत ईडीने याआधी सलीम फ्रूटचे स्टेटमेंट नोंदवले आहे. छोट्या शकीलच्या पाकिस्तानातील घरी त्याने 3 ते 4 वेळा भेट दिली आहे. 2006 मध्ये युएईतून सलीम फ्रूटची हकालपट्टी करण्यात आली होती. छोटी शकीलसाठी तो खंडणी वसूल करण्याचे काम करत होता. तसेच, 2006 मध्ये त्याला अटक करण्यात आली होती. सलीमवर मोक्का लावण्यात आला होता. 2010 पर्यंत सलीम फ्रूट हा जेलमध्ये होता. सलीम हा हसीना पारकरचाही निकटवर्तीय आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here