‘एनआयए’चे धाडसत्र! तामिळनाडूत शस्त्र आणि ड्रग्ज तस्करांवर कारवाई

111

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शस्त्रास्त्र, अंमलीपदार्थ आणि सोने तस्करांवर कारवाई केली आहे. याप्रकरणी गुरुवारी एनआयएने चेन्नईत 8 ठिकाणी धाडी टाकून अय्यप्पन नंदू याला अटक केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत 14 जणांना अटक करण्यात आली असून, हे सर्व आरोपी तस्करीच्या पैशातून ‘लिब्रेशन टायगर्स ऑफ तमिल ईलम’ (एलटीटीई) या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेच्या पुनरूज्जीवनासाठी प्रयत्न करत होते.

( हेही वाचा : मुंबईत ३ अतिरेकी दाखल! पोलीस नियंत्रण कक्षाला फोन आल्याने खळबळ)

यासंदर्भातील माहितीनुसार एनआयएने गुरुवारी चेन्नईतील 8 संशयितांच्या निवासस्थानी आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांवर धाडी टाकल्या. यावेळी अय्यप्पन नंदूला अटक करण्यात आली असून आतापर्यंत 14 जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी एनआयएने जुलै 2022 मध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर, तमिळनाडूमध्ये 21 ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये डिसेंबर 2022 मध्ये आणखी 13 जणांना अटक करण्यात आली होती.

श्रीलंकेतील अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांच्या व्यापारातून मिळालेला पैसा चेन्नई येथील रहिवासी शाहिद अलीसह हवाला एजंटमार्फत भारतात आणला गेला. शाहिद अलीच्या दुकानातून जप्त केलेल्या वस्तूंमध्ये भारतीय चलनातील 68 लाख रुपये आणि एक हजार सिंगापूर डॉलर्स आणि प्रत्येकी 300 ग्रॅम वजनाची 9 सोन्याची बिस्किटे यांचा समावेश आहे. तसेच चेन्नईच्या ऑरेंज पॅलेस हॉटेलमधून 12 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.