NIA ॲक्शन मोडमध्ये! देशातील 60 हून अधिक ठिकाणांवर छापेमारी

136

एनआयएने गुंडांच्या आणि त्यांच्या टोळ्यांवर कारवाई करत आहे. क्राइम रॅकेट चालणाऱ्या या टोळीला गुडघे टेकण्यासाठी एनआयए म्हणजेच राष्ट्रीय तपास यंत्रणेने 12 सप्टेंबर रोजी देशभरात विविध 60 ठिकाणी छापे टाकले. या 60 ठिकाणांमध्ये दिल्ली, एनसीआर, पंजाब आणि हरियाणा, राजस्थानसह पश्चिम उत्तर प्रदेशचा समावेश आहे. तपास यंत्रणेने या कुख्यात गुंडांच्या विरोधात देशात अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. तर अनेक कुख्यात गुडांचे अड्डे या तापस यंत्रेणेच्या निशाण्यावर आहेत. एनआयएकडून नीरज बवाना, लॉरेन्स बिश्नोई आणि टिल्लू ताजपुरिया यांच्यासह 10 गुंडांची यादी तयार केली होती. त्या टोळ्यांविरोधात वेगवेगळ्या अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले आहेत.

(हेही वाचा – सायबर क्राईमविरोधात Online तक्रार करायची आहे? ‘या’ आहेत सोप्या स्टेप्स)

दरम्यान देशातील तुरुंगात आणि परदेशात असणाऱ्या गुंडाविरोधात ही कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी एनआयएकडून हरियाणा आणि पंजाब पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली असून पुढील कारवाईसाठी कडक धोरण अवलंबविणार असल्याची माहिती मिळत आहे. एनआयएने गुंडांच्या आणि त्यांच्या टोळ्यांवर कारवाई करण्यासाठी संपूर्ण माहितीपत्र तयार केले असून 10 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्येप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सोमवारी देशाच्या अनेक भागात छापे टाकले आहेत. मुसेवाले यांच्या हत्येशी संबंध असलेल्या संशयित दहशतवादी टोळ्यांसंदर्भात ही कारवाई करण्यात येत आहे. रविवारी पंजाबमधील चंदिगड पोलिसांनी अंतिम आरोपी नेमबाज दीपक मुंडी आणि त्याचे दोन सहकारी कपिल पंडित आणि राजिंदर उर्फ ​​जोकर यांना पश्चिम बंगालमधील भारत-नेपाळ सीमेवरून मूसेवाला खून प्रकरणात अटक केली. मूसेवाला यांच्या हत्येप्रकरणी पंजाब पोलिसांनी आतापर्यंत 23 आरोपींना अटक केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.