राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) गुरुवारी पहाटे केरळमधील प्रतिबंधित संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) विरोधात मोठी कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएच्या अनेक पथकांनी राज्यात पीएफआयच्या 56 ठिकाणांवर छापे टाकले आहेत.
‘या’ ठिकाणांवर NIA ची छापेमारी
राज्यातील एनार्कुलममधील आठ ठिकाणी आणि तिरुवनंतपुरममधील सहा ठिकाणी पीएफआयच्या अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले आहेत. याशिवाय त्रिवेंद्रमपुरमसह अनेक ठिकाणी एनआयएचे पथक कारवाई करत आहेत. पीएफआयवर बंदी घालण्यात आल्यानंतर या संघटनेविरुद्धची ही मोठी कारवाई आहे. या संघटनेशी संबंधित लोक पुन्हा सक्रिय होऊन पीएफआयला पुनरुज्जीवन देण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाली होती.
( हेही वाचा: जगभरातील अनेक भागांत Twitter पुन्हा डाऊन; नेटकरी हैराण )
याआधीही झालीय कारवाई
यापूर्वी, गेल्या काही महिन्यांत एनआयएच्या विरोधात देशव्यापी छापे टाकण्यात आले होते. ज्यामध्ये मोठ्या संख्येने संघटनेशी संबंधित लोकांना अटक करण्यात आली होती. सप्टेंबरमध्ये पीएफआयचा ISIS सारख्या कुख्यात दहशतवादी संघटनांशी असलेला संबंध उघड झाला. त्यानंतर पीएफआय आणि त्याच्याशी संबंधित इतर काही संस्थांवर बंदी घालण्यात आली होती.
Join Our WhatsApp Community