NIA चा दणका! मलिकांचा साथीदार आणि माहीम दर्ग्याचे विश्वस्त खंडवाणींची मालमत्ता जप्त

सध्या ईडीच्या अटकेत असलेले अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा साथीदार आणि मुंबईतील माहिम, हाजी अली दर्ग्याचे विश्वस्त सुहेल खंडवाणींची यांना एनआयएचा दणका बसल्याचे समोर आले आहे. सोमवारी पहाटे एनआयएच्या पथकाने मुंबईतील माहीममध्ये 4 ठिकाणी छापेमारी केली आहे. माहीम दर्ग्याचे विश्वस्त सोहेल खंडवाणी यांच्या मालमत्तावरही छापेमारी करण्यात आली आहे.

(हेही वाचा – राणा दाम्पत्य दिल्लीकडे रवाना,भाजप नेत्यांसोबत भेटीगाठी होणार?)

मिळालेल्या माहितीनुसार, माहीम परिसरात सुहेल खांडवानी राहत असून सोमवारी पहाटे त्यांच्या घराच्या परिसरात मोठा सीआरपीएफ पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. तसेच बाबा फालुदाचे मालक अस्लम सोरटिया यांच्या मालमत्तांवरही छापेमारी करण्यात आली आहे. मुंबईत दाऊदशी संबंधित सध्या 20 ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. एनआयएने केलेल्या कारवाईमुळे मुंबईतील काही भागात एकच खळबळ निर्माण झाली आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने अर्थात एनआयए सोमवारी मोठी कारवाई केली आहे. एनआयएने आज, सोमवारी मुंबईतील 20 ठिकाणी छापे टाकले आहेत. हे 20 अड्डे दाऊदचे शार्प शूटर, तस्कर, डी-कंपनीचे रिअल इस्टेट मॅनेजर यांच्याशी संबधित असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय अनेक मनी लाँड्रिंग ऑपरेटर्सवरही छापे टाकण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, ज्या प्रकरणात हे छापे टाकण्यात आले ते हेच प्रकरण आहे ज्यात ईडीने राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना अटक करण्यात आली होती.

मुंबईतील या 20 अड्ड्यांवर छापेमारी

मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएने बोरिवली, सांताक्रूझ, वांद्रे, नागपाडा, गोरेगाव, परळ येथील 20 ठिकाणी छापे टाकले आहेत. गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, एनआयएने दाऊद इब्राहिम, डी कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला होता, ज्यासंदर्भात ही चौकशी आणि छापेमारी सुरू आहे. दाऊद इब्राहिमशी संबंधित प्रकरणाचा तपास गृह मंत्रालयाने फेब्रुवारी 2022 मध्ये एनआयएकडे सोपवला होता. राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ही देशातील सर्वात मोठी दहशतवादी तपास संस्था आहे. यापूर्वी ईडी दाऊदशी संबंधित प्रकरणांची चौकशी करत होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here