उदयपूर हत्याकांडाचा NIA करणार तपास

राजस्थानच्या उदयपूर येथील कन्हैयालाल यांच्या हत्येचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) करणार आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपींची एनआयएने चौकशी सुरू केली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकरणी दहशतवादविरोधी कायदा आणि बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(हेही वाचा – राजकीय अस्थिरतेत २७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर )

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका धर्माबद्दल कथित आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर शर्मा यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. उदयपूरमध्ये हत्या करण्यात आलेल्या कन्हैय्या लालच्या 8 वर्षीय मुलाने नुपूर शर्माच्या समर्थनात सोशल मिडीयावर पोस्ट केली होती. त्यावरून संतप्त झालेल्या गौस मोहम्मद आणि रियाज अख्तर यांनी षडयंत्र रचून सोमवारी उदयपूरच्या धनमंडी पोलीस स्टेशन परिसरातील दुकानात घुसून कन्हैयालाल नावाच्या व्यक्तीचा गळा चिरून हत्या केली. यावेळी कन्हैय्यावर एकूण 54 वार करण्यात आले होते. तसेच त्याच्या गळ्यावर 10 वार करून गळा कापण्यात आला होता.

या घटनेनंतर कन्हैया याचा गळा चिरलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला. तसेच पंतप्रधानांना ठार करण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्हैया याची हत्या करण्यात आल्यानंतर गौस आणि रियाजला राजसमंद जिल्ह्यातील भीम परिसरातून त्याब्यात घेण्यात आले. राजसमंदचे पोलीस अधीक्षक सुधीर चौधरी यांनी सांगितले की, दोन्ही आरोपी हेल्मेट घालून मोटारसायकलवरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते पण भीमा परिसरात नाकाबंदी दरम्यान त्यांना पकडण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here