पुण्यात लागू झाले निर्बंध… काय सुरू काय बंद?

उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

राज्यात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत असताना काही ठिकाणी कडक निर्बंध लागू केले जाणार असल्याचे स्थानिक प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांकडून वारंवार सांगण्यात येत आहे. त्यानुसार आता पुणे जिल्ह्यात कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

लॉकडाऊन नाही तर निर्बंध

सध्या पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पुण्यातील परिस्थिती ही काहीशी चिंताजनक आहे. त्यामुळे पुण्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात लॉकडाऊन लागू करण्यात येणार नाही. मात्र कडक निर्बंध घालण्यात येणार आहेत.

(हेही वाचाः एमपीएससी परीक्षांची नवी तारीख जाहीर… कधी होणार परीक्षा? वाचा…)

बैठकीत निर्णय

पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्त उपस्थितीत होते. या बैठकीत निर्बंधांबाबत निर्णय घेण्यात आला. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्चपर्यंत 31 मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे, तसेच उद्यान एकवेळ बंद राहणार आहेत. हॉटेल आणि मॉल रात्री 10 पर्यंत सुरु राहणार आहेत, असे राव यांनी सांगितले.

(हेही वाचाः वकील, न्यायाधीशांसाठी लसीकरणाची मागणी करता, हा तर स्वार्थ! उच्च न्यायालयाने फटकारले )

संचारबंदी लागू

लग्न सभारंभ आणि दशक्रिया विधीला 50 पेक्षा जास्त लोकांना परवानगी दिली जाणार नाही. पुणे शहरात रात्रीची संचारबंदी लागू केली जाणार आहे. रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळून संचारबंदी असणार आहे. पुण्यात लॉकडाऊन होण्याची भूमिका कोणाचीही नाही, असे सौरभ राव म्हणाले.

राज्यात काय आहे परिस्थिती?

पुणे शहरात गुरुवारी नव्याने 1 हजार 504 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. बुधवारी पुण्यात 1 हजार 352 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर मंगळवारी 1 हजार 86 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. राज्यात पुणे, नागपूर, ठाणे, मुंबई, अमरावती, जळगाव, नाशिक आणि औरंगाबाद या आठ जिल्ह्यांमध्ये देशातील सर्वात जास्त ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. त्यातही पुण्यात 18,474 इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. त्यानंतर अनुक्रमे नागपूर, ठाणे आणि मुंबईचा क्रमांक लागतो.

(हेही वाचाः राज्यात कोरोनाचा विस्फोट! एकाच दिवशी १४,३१७ नवीन रुग्ण संख्या!! )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here