Night Landing Of Helicopters : गडचिरोलीमध्ये हेलिकॉप्टरचे नाईट लॅंडिग होणार; गृहमंत्र्याचे आश्वासन

नक्षलग्रस्त जिल्ह्याला नक्षलवादापासून मुक्त करायचे असेल तर स्थानिक तरूणांना रोजगार मिळणे आवश्यक आहे

156
Night Landing Of Helicopters : गडचिरोलीमध्ये हेलिकॉप्टरची नाईट लॅंडिग होणार; गृहमंत्र्याचे आश्वासन
Night Landing Of Helicopters : गडचिरोलीमध्ये हेलिकॉप्टरची नाईट लॅंडिग होणार; गृहमंत्र्याचे आश्वासन

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात हेलिकॉप्टरची नाईट लॅंडिगची (Night Landing Of Helicopters) व्यवस्था करण्याची गरज असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी गृहमंत्रालयाने बोलाविलेल्या बैठकीत व्यक्त केले. तर, नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी राज्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहे.

गृहमंत्रालयाने नक्षलवादाच्या मुद्यावर बोलाविलेल्या बैठकीत सहभागी झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, गडचिरोली एक नक्षलग्रस्त जिल्हा आहे. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात पोलिस जखमी झाले तर त्यांना वेळेत चांगल्या हॉस्पिटलमध्ये हलविणे गरजेचे असते. यामुळे गडचिरोलीत हेलिकॉप्टरची नाईट लॅंडिग (Night Landing Of Helicopters) होईल अशी व्यवस्था होणे खूप गरजेचे असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत व्यक्त केले.

नक्षलग्रस्त जिल्ह्याला नक्षलवादापासून मुक्त करायचे असेल तर स्थानिक तरूणांना रोजगार मिळणे आवश्यक आहे. यासाठी त्या भागाचा विकास होणे गरजेचे आहे. गडचिरोली जिल्ह्यात लॉएड कंपनी 20 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे. यातून 10 हजार लोकांना रोजगार मिळेल. परंतु, यासाठी रेल्वेचे जाळे विणणे गरजेचे आहे. येथे रेल्वे आली तर दळणवळणाचा त्रास होणार नाही. यासाठी गृहमंत्र्यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.

(हेही वाचा-CJI DY Chandrachud : ‘न्यायाधीश व्हायचे असेल, तर तंत्रज्ञान शिकावेच लागेल’, मुंबई हायकोर्टाच्या कार्यपद्धतीवर सरन्यायाधीशांचे ताशेरे)

शिंदे यांचा उध्दव ठाकरेवर घणाघात

कोरोनामुळे लोकांचे जीव जात असताना घरात बसून तोंडाला मास्क लावून फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा समाचार घेतला.

माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नांदेडमध्ये औषधाअभावी झालेल्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. यावर आपली प्रतिक्रिया काय? या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर शरसंधाण साधले. ते म्हणाले की, नांदेडमध्ये जो प्रकार घडला आहे तो फार दुर्दैवी आहे. परंतु, त्या प्रकाराचे राजकारण करणे त्याहून जास्त दुर्दैवी आहे. मात्र, मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याची सवय असलेल्या लोकांकडून आणखी दुसरी अपेक्षा काय केली जावू शकते, असे शिंदे म्हणाले.

शिंदे पुढे म्हणाले की, ‘ज्यांनी डेड बॉडी बॅगचे पैसे खाल्ले, खिचडी 300 ग्रॅमऐवजी 100 ग्रॅम दिली. हेही पैसे खाल्ले. ऑक्सिजन प्लांटमध्ये पैसे खाल्ले’, यासर्व गोष्टी आता बाहेर येवू लागल्या आहेत. कोरोनात लोक मरत होते हे घरात बसून नोटा मोजत होते. मुंबई महापालिकेच्या व्यवहारात झालेला भ्रष्टाचार बाहेर येवू लागला आहे. या प्रकरणाच्या चौकशीपासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी वेगवेगळे बहाणे शोधत आहेत, अशा शब्दात शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता सुनावले.

औषधांची खरेदी चुकीच्या पध्दतीने झाली असेल तर ते चौकशीतून पुढे येईल, असेही शिंदे म्हणाले. उपमुख्यमंत्र्यांनी नांदेडला जावून बघण्याची गरज होती असे म्हणणारे एक फुल एक हाफ यांनी आम्हाला शिकविण्याची गरज नाही. मंत्री हसन मुश्रीफ आणि गिरीश महाजन नांदेडला जावून आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रातील रूग्णालयांना भेटी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही शिंदे म्हणाले.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.