निकोलाई लेस्कोव्ह (Nikolai Leskov) हे रशियन कादंबरीकार, लघुकथा लेखक, नाटककार आणि पत्रकार होते. त्यांनी एम. स्टेबनित्स्की या टोपणनावाने देखील लेखन केले आहे. लेडी मॅकबेथ ऑफ मेटसेन्स्क, द कॅथेड्रल फोक, द एनचांटेड वंडरर ’द टेल ऑफ क्रॉस-आय्ड लेफ्टी फ्रॉम टुला ऍंड स्टील फ्ली’ ह्या त्यांच्या गाजलेली रचना आहेत.
लेस्कोव्ह (Nikolai Leskov) यांचा जन्म १६ फेब्रुवारी १८३१ रोजी झाला. त्यांनी ओरिओल लिसियम येथे औपचारिक शिक्षण घेतले. १८४७ मध्ये लेस्कोव्ह ओरियोल फौजदारी न्यायालयाच्या कार्यालयात रुजू झाले. पुढे कीव येथे लिपिक म्हणून काम केले. १८५७ मध्ये लेस्कोव्हने लिपिकाची नोकरी सोडली आणि स्कॉट अँड विल्किन्स या खाजगी ट्रेडिंग कंपनीत काम करायला सुरुवात केली.
(हेही वाचा-Maratha Reservation : इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा)
१८६० साली त्यांनी आपल्या साहित्यिक कारकीरीला सुरुवात केली. १८६२ साली द एक्टिंग्विश्ड फ्लेम आणि १८६३ साली मस्क-ऑक्स आणि १८६३ साली द लाइफ ऑफ पीझंट वुमन हे लघूकथा संग्रह म्हणजे त्यांचे सुरुवातीचे साहित्य होते. त्यांची पहिली कादंबरी नो वे आउट १८६४ मध्ये प्रकाशित झाली. त्यांनी पत्रकारिता, रेखाचित्रे, लघुकथा आणि कादंबऱ्या अशा साहित्याच्या विविध प्रांगणात विहार केला आहे.(Nikolai Leskov)
त्यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. रशियन ऑर्थोडॉक्स चर्चवर त्यांनी व्यंगात्मक टीका केल्यामुळे त्यांच्या अनेक साहित्यिक रचनेवर बंदी घालण्यात आली होती. ५ मार्च १८९५ रोजी, वयाच्या ६४ व्या लेस्कोव्ह यांचे निधन झाले.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community