दुचाकीस्वार आणि नीलगाईची टक्कर, ५० फूट अंतरापर्यंत ऐकायला आला आवाज!

ठाण्यातील शहापूर तालुक्यातील उंभ्रई गावात नीलगाई आणि दुचाकीस्वाराची टक्कर झाल्याची विचित्र घटना बुधवारी घडली. या टक्करीत दोघांचाही मृत्यू झाला. उंभ्रई फाट्याच्या किन्हवली भागांतील फार्महाऊसजवळ हा अपघात घडला. या अपघाताचा आवाज ५० फूट अंतरापर्यंत ऐकायला आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

अशी घडली घटना

सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हा अपघात घडला. पंढरी बुधा वाघ (२०) यांच्या दुचाकीसमोर अचानक नीलगाय आल्याने दोघांचीही टक्कर झाली. या अपघाताचा आवाज ऐकून पोलीस पाटील द्वारकानाथ चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेच्यावेळी चौधरी कामानिमित्ताने किन्हवली शहापूर मार्गावरील उंभ्रई फाटा येथे उभे होते. त्यांनाही या अपघाताचा आवाज ऐकू आला. चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना नीलगाय मृतावस्थेत आढळली तर दुचाकीस्वाराला गंभीर जखमा झाल्याचे दिसून आले. चौधरी यांनी अपघातग्रस्त इसमाला किन्हवली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असताना डॉक्टरांनी रुग्णाला मृत घोषित केले.

(हेही वाचा – सर्वच औषध पुरवठादारांनी हाफकिनला काळ्या यादीत टाकले, वाचा काय आहे कारण)

दवाखान्यातील दुस-या रुग्णाला मृताची ओळख पटली असता त्याचे नाव पंढरी बुधा वाघ (२०) असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. या अपघाताची किन्हली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here