नागपूरातील बुटीबोरी वनपरिक्षेत्रातील माहितगारांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वनाधिकाऱ्यांनी नीलगाय शिकार प्रकरणी आरोपींना रंगेहाथ पकडले. सोमवारी ही घटना घडली. खर्डा आणि टेंभरी येथील सर्वे क्रमांक ३६ येथे वनाधिकाऱ्यांनी धाड टाकून नीलगायीचे मांसही जप्त केले. या प्रकरणी नागपूर येथील दिलीप मुंगले, राहुल लोखंडे, हेमंत चीचम, इतवारीसिंग सयाम या चार आरोपींना वनाधिका-यांनी ताब्यात घेतले. नीलगायीची शिकार कुठून केली, याबाबतची माहिती वनाधिकाऱ्यांनी गुप्त ठेवली. आरोपींकडून नीलगायीचे मांस कापण्यासाठी वापरलेली कु-हाड वनाधिका-यांनी जप्त केली आहे.
( हेही वाचा : श्रीलंकेनंतर आता भारताचे मिशन न्यूझीलंड! पहा सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक)
आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियम कायदा १९७२ नुसार कलम २१(६),९,३९,४४,४८(अ),४९(ब),५०,५१नुसार वनगुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई नागपूर वनविभाग (प्रादेशिक)चे उपवनसंरक्षक भरतसिंह हाडा यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. या कारवाईत उमरेड जंकास-२ येथील सहायक वनसंरक्षक एन.जी.चांदेवार, बुटीबोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी पी.एम.वाडे,वनपाल एस.बी.केकान, महादेव मुंडे, निलेश तवले, योगेश ताडम, मारोती मुंडे यांनी सहभाग घेतला.