राज्यात महिला सुरक्षित? गेल्या काही दिवसांत घडल्या ‘इतक्या’ बलात्काराच्या घटना

या घटना पाहता, महाराष्ट्र महिलांवरील अत्याचारांचा केंद्रबिंदू बनला असल्याचे निदर्शनास येते.

काही दिवसांपूर्वी साकिनाका येथे 30 वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कारानंतर राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला यावरुन अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे गेल्या काही दिवसांत राज्यात महिलांवरील अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. तरीही यातील काही घटनांमधील दोषी आजही मोकाट फिरत असून, त्यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. गेल्या काही दिवसांत राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या अशा एकूण 9 घटना समोर आल्या आहेत. या घटना पाहता, महाराष्ट्र महिलांवरील अत्याचारांचा केंद्रबिंदू बनला असल्याचे निदर्शनास येते.

साकिनाका बलात्कार प्रकरण

9 सप्टेंबर रोजी अंधेरीतील साकिनाका परिसरात एका 30 वर्षीय तरुणीवर निर्घृणपणे बलात्कार करण्यात आला. या घटनेत पीडित महिलेचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील आरोपी मोहन चौहान याने पीडित महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगांत लोखंडी रॉड घुसवला. यामुळे पीडित महिला गंभीररित्या जखमी झाली. पहाटे 2.30 च्या सुमारास ही महिला पोलिसांना साकिनाका परिसरातील खैरानी रोड येथे रक्तबंबाळ अवस्थेत सापडली. शेवटी 33 तास मृत्यूशी झुंज देणा-या या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

(हेही वाचाः राज्यपालांनी महिला सुरक्षेसाठी लिहिलेल्या पत्राला सरकारकडून केराची टोपली?)

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

साकिनाक्यातील घटना ताजी असतानाच राज्यातील अमरावती जिल्ह्यात असाच एक क्रूर प्रकार पहायला मिळाला. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने बलात्कार केला. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेनंतर पीडित तरुणी गर्भवती राहिल्याचे तिच्या लक्षात आले. त्यामुळे तिने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा अंत केला.

दोषीने पीडित तरुणीवर वारंवार बलात्कार केला. त्यानंतर आपण गर्भवती असल्याचे कळताच तिने आत्महत्या केली, अशी तक्रार दाखल झाल्याचे येवडा पोलिस स्थानकाचे पोलिस उपनिरीक्षक दिलीप पाटील यांनी सांगितले.

(हेही वाचाः बलात्कारानंतर हत्या : देशभरातील १० टक्के घटना घडल्या महाराष्ट्रात!)

पुण्यात 6 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार

पुणे रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या बस स्थानकाजवळील फूटपाथवर 6 वर्षीय तरुणी आणि तिचे कुटुंब राहत होते. एका रात्री ही चिमुकली आपल्या आई-वडिलांसोबत फूटपाथवर झोपलेली असताना, एका रिक्षा चालकाने तिला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केला. 10 सप्टेंबर रोजी या घटनेची नोंद करण्यात आली. दुस-या एका रिक्षा चालकाने आरोपीला मुलीला रिक्षेतून घेऊन जाताना पाहिले होते. त्याने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी चिमुरडीची सुटका केली.

गतिमंद मुलीवर अत्याचार

एका अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना पालघर जिल्ह्यातील वसई येथे घडली. या घटनेत एका 16 वर्षीय गतिमंद तरुणीवर निर्दयीपणे बलात्कार करण्यात आला. दोषी असलेल्या नराधमाने पीडित तरुणीला आपल्या मोटारसायकलवरुन एका अज्ञात ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केले. ही घटना 7 सप्टेंबर रोजी घडली. दोन दिवसांनी पीडितेच्या नातेवाईकांनी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

(हेही वाचाः साकीनाका बलात्कार प्रकरण : सेनेने वेधले हाथरस, कठुआ प्रकरणांकडे लक्ष!)

अनाथ तरुणीवर अत्याचार

वसई येथीलंच दुस-या एका घटनेत तीन जणांनी 17 वर्षीय अनाथ तरुणीवर 28 ऑगस्ट रोजी बलात्कार केला. या तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर अपहरण आणि बलात्काराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे पॉक्सो कायद्यांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

14 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार

पुणे रेल्वे स्थानकातून एका 14 वर्षीय मुलीचे अपहरण करुन तिच्यावर 14 जणांनी आळीपाळीने बलात्कार केल्याची अमानुष घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी 31 ऑगस्ट रोजी रात्री 10.30 वाजता आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकात गेली होती. परंतु तिची मैत्रीण न आल्यामुळे ती कावरीबावरी झाली. तिची अस्वस्थता स्थानक परिसरातील एका रिक्षा चालकाने ताडली. आपण तुला घरी सोडतो असे सांगत त्याने तिला आपल्या रिक्षेत बसवून जवळील एका लॉजवर नेत, तिच्यावर बलात्कार केला.

त्यानंतर त्या नराधमाने तिला आपल्या मित्रांच्या स्वाधीन करुन, त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. या निंदनीय कृत्यात एकूण 14 जणांचा सहभाग असून, त्यापैकी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. या 8 जणांपैकी 6 जण रिक्षाचालक असून, 2 रेल्वे कर्मचारी असल्याची माहिती मिळत आहे. यातील 6 आरोपी अजूनही उजळ माथ्याने फिरत आहेत.

(हेही वाचाः शक्ती मिल बलात्कार प्रकरणातील ‘तो’ अल्पवयीन आरोपी आता काय करत आहे?)

मीरावाली शेख, महबूब उर्फ ​​गौस शेख, आसिफ पठाण, शाहजूर उर्फ ​​सिराज छपरबंद, समीर शेख, फिरोज उर्फ ​​शाहरुख शेख. अकबर अमर शेख, नोएब नईम खान, आसिफ फिरोज पठाण, रफिक मुर्तजा शेख, मशाक अब्दुलमजीद कन्याल, अझरुद्दीन इस्लामुद्दीन अन्सारी, प्रशान सॅम्युएल गायकवाड, आणि राजकुमार रामांगीना प्रसाद, अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पुण्यात सामूहिक बलात्कार

पुणे शहरातील जनता वसाहत येथे राहणा-या 25 वर्षीय तरुणीवर बलात्कार करणा-या चौघांना पुणे पोलिसांनी 27 ऑगस्ट रोजी गजाआड केले. पीडित तरुणी स्वारगेट परिसरात गेली असता, एका आरोपीने तिला जबरदस्ती जनता वसाहत येथील एका खोलीत नेले. त्यानंतर त्याने आपल्या तीन मित्रांना बोलावून तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. परिसरातील रहिवाशांनी तरुणीचा आरडाओरडा ऐकल्यानंतर ताबडतोब पोलिसांना बोलावले. तेव्हा या चौघांना अटक करण्यात आली.

(हेही वाचाः साकीनाका बलात्कार प्रकरण : एक महिन्यात तपास होणार पूर्ण!)

नागपुरात अमानुष अत्याचार

एका अल्पवयीन तरुणीवर सहा जणांनी काही तासांच्या फरकांत दोन वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नागपूर येथे घडली. या 6 जणांपैकी 4 जण हे रिक्षाचालक होते. 29 जुलै रोजी नागपूर येथील टिमकी परिसरात पीडित तरुणीवर एका खोलीत 4 नराधमांनी लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर मायो हॉस्पिटल स्क्वेअर परिसरात दोन रिक्षाचालकांनी याच पीडितेवर पुन्हा अत्याचार केले. शाहनवाज अल्यास सना मोहम्मद राशिद असे यातील मुख्य आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीने शाहनवाजकडे घर मिळवून देण्यास मदत करण्याची मागणी केली. आश्रय देण्याच्या नावाखाली त्याने तिला आपल्या रिक्षेतून एका बेकायदेशीर दारुच्या अड्ड्यावर नेले. तिथे त्याने दारुचे सेवन करुन जबरदस्ती तरुणीलाही दारू पाजली. त्यानंतर त्याने तिला टिमकी परिसरातील एका भाड्याच्या खोलीत आणले. तिथे आपले मित्र मोहम्मद युसूफ आणि नागपूर रेल्वे स्थानकावरील दोन कर्मचा-यांसह शाहनवाजने पीडितेवर बलात्कार केला.

(हेही वाचाः महाराष्ट्रात दबंगगिरी)

त्यानंतर त्याने तरुणीला आपल्या रिक्षेतून मायो हॉस्पिटल परिसरात फेकून दिले. तो गेल्यानंतर तिथे असणा-या आणखी दोन रिक्षाचालकांनी पीडितेला आपल्या रिक्षेत नेले व तिच्यावर बलात्कार केला.

पिंपरीत शिक्षिकेवर बलात्कार

निवृत्त पोलिस अधिकारी असल्याचे सांगत एका इसमाने शिक्षिकेवर बलात्कार केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील पिंपरी येथे घडली. आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या शिक्षिकेला पैशांची मदत करण्याचे सांगत या इसमाने तिला आपल्या घरी बोलावले. शिक्षिका त्याच्या घरी पोहोचल्यानंतर त्याने को-या चेकवर सही करुन तो तिला दिला. त्यानंतर त्याने तिला ड्रिंक घेण्यास सांगून तिच्याशी गैरवर्तन करायला सुरुवात केली. शिक्षिकेने जेव्हा विरोध केला तेव्हा त्याने बळजबरीने तिचे अश्लिल फोटो काढले. जर तिने त्याचे ऐकले नाही तर ते फोटो व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली. त्यानंतर आपल्या दुचाकीवरुन अज्ञात स्थळी नेऊन त्याने पीडित शिक्षिकेचे लैंगिक शोषण केले.

वारंवार घडणा-या या घटनांमुळे राज्यातील महिला खरंच सुरक्षित आहेत का, असा सवाल राज्य सरकारला विचारण्यात येत आहे.

(हेही वाचाः जाफर चिकनाला न्यायालयाने दिली ‘ही’ शिक्षा!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here