उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर! घराची भिंत कोसळून 9 जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. लखनौ आणि उन्नावमध्ये अनेक घरांच्या भिंती कोसळल्याने दुर्घटना देखील घडल्याचे समोर आले आहे. राजधानी लखनऊच्या कँटमधील दिलकुशामध्ये भिंत कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, भिंत कोसळण्याची घटना घडली तेव्हा मृत्यू पावलेले हे लोक झोपले होते. मृतांमध्ये तीन महिला, तीन पुरुष आणि तीन मुलांचा समावेश आहे. मदत आणि बचाव कार्यात मदत करण्यासाठी एनडीआरएफला पाचारण करण्यात आले आहे. सध्या घटनास्थळी कोसळलेल्या भिंतीचा ढिगारा बाजूला करण्याचे काम सुरू आहे. मात्र मुसळधार पावसाने मदतकार्य करण्यास अडचणी येत आहेत.

(हेही वाचा – गिरगाव चौपाटीची स्वच्छता नौदल ‘काश’ कॉलेज विद्यार्थ्यांसह करेल!)

उन्नावमध्येही भिंत कोसळल्याने अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. मुसळधार पावसामुळे झालेल्या अपघातांबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना घटनास्थळी पोहोचून मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच पीडितांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here