मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानामागे वेगळाच डाव

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात बोलताना केलेल्या एका विधानावरून तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. व्यासपीठावर बसलेले रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्याकडे बघून त्यांनी “आजी, माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी”, असा उल्लेख केल्यानंतर शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येणार का?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या विधानानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी वेगळाच संशय व्यक्त केला आहे.

नेमकं काय म्हणाले नितेश राणे?

शुक्रवारी पहाटे मुंबईतील बीकेसी परिसरात निर्माणाधीन असलेल्या एका उड्डाणपुलाचा गर्डर कोसळून दुर्घटना घडली होती. यामध्ये 10 मजूर जखमी झाले होते. या दुर्घटनेवरून प्रसारमाध्यमांचे लक्ष हटवण्यासाठीच उद्धव ठाकरे यांनी भाजप-शिवसेना युतीची आशा दाखवणारे वक्तव्य केले का, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.

काय होतं मुख्यमंत्र्यांचे विधान?

मुख्यमंत्र्यांची औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारत उद्घाटन प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भाषणाची सुरुवात करताना व्यासपीठावरच्या उपस्थित मान्यवरांना आजी-माजी सहकारी, असे संबोधित केले होते. एवढेच नाही तर भावी सहकारी असा उल्लेख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here