‘दोन वर्षात इलेक्ट्रॉनिक वाहनं पेट्रोल-डिझेल गाड्यांच्या किमतीत’

107

केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी मुंबईत महामार्ग, वाहतूक आणि लॉजिस्टिकमधील गुंतवणुकीच्या संधी या विषयावर संबोधित करताना राष्ट्रीय परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते. भारतात दोन गोष्टींसाठी जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत एक म्हणजे लोकसंख्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑटोमोबाईल ग्रोथ, असे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. तसेच येत्या दोन वर्षात इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या किमती पेट्रोल-डिझेलच्या वाहनांएवढी होईल, असा विश्वासही गडकरींनी व्यक्त केला आहे.

केंद्र-राज्य सहकार्यावर भर देण्याचे उद्दिष्ट

नितीन गडकरी म्हणाले, एकेकाळी १९९५ मध्ये आमच्याकडे गुंतवणूकदार नव्हते पण आता स्वत:हून गुंतवणूकदार आमच्याकडे येत आहेत. पहिल्यांदा मंत्री झालो तेव्हा टी.व्ही घेण्याइतपत पैसे नव्हते. तेव्हा इन्स्टॉलमेंटवर टी.व्ही घेण्याचा विचार केला होता. शेवटी टी.व्ही काही घेतला नाही पण, टी.व्ही. इन्स्टॉलमेंटवर घेऊ शकतो तर, रोड का नाही बांधू शकत या विचाराने मी  पहिला ठाणे-भिवंडी बायपास रोड बनवला असे गडकरींनी नमूद केले.

भारताच्या लॉजिस्टिक क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारची विविध मंत्रालये आणि खाजगी क्षेत्र यांच्यातील सहकार्यावर भर देण्याचे या परिषदेचे उद्दिष्ट आहे. या परिषदेत संभाव्य गुंतवणूकदार, उद्योग तज्ञ आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या मंत्रालयांचा सहभाग होता.

( हेही वाचा : तारीख पे तारीख! ४१ वर्षांपासून सुरू होता खटला, अखेर केस बंद करण्याची पीडितेची मागणी )

अनेक प्रकल्प मार्गी लागणार

पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली इन्फ्रास्ट्रक्चर कमिटी स्थापन केली जाणार आहे. वरळी वांद्रे हा प्रोजेक्ट 420 कोटी होता. नंतर तो प्रोजेक्ट साडे आठशे कोटींवर गेला. गुंतवणूकदारांची व्याप्ती आम्ही येत्या काळात वाढवत आहोत. आता 12 तासात रस्त्याने मुंबई ते दिल्ली जाता येईल. अगरबत्तीच्या काड्या आता चीनमधून आयात न करता त्रिपुरामध्ये उत्पादित केल्या जातात. यामुळे एकंदरीत अनेक प्रकल्प मार्गी लावणे शक्य होणार आहे. असे गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.