जीवनावश्यक औषधे भारतात स्वस्त होणार आहेत. त्यामुळे आता सर्वसामान्यांना परवणाऱ्या दरात असाध्य रोगांवरची औषधं मिळणार आहे. केंद्र सरकारच्या नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शिअल मेडिसिन (NLEM) या योजनेमुळे स्वस्तात मेडिसिन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
NLEM मध्ये सूचीबद्ध असलेली औषधे नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) ने निश्चित केलेल्या किंमत मर्यादेपेक्षा कमी विकली जातात. प्रथमच NLEM 1996 मध्ये तयार करण्यात आले. यापूर्वी 2003, 2011 आणि 2015 मध्ये त्यात बदल करण्यात आला आहे. आता ही यादी सप्टेंबर 2022 मध्ये पाचव्यांदा सुधारली जात आहे. राष्ट्रीय अत्यावश्यक यादीत आता 384 औषधांचा समावेश आहे. माहितीनुसार, यादीत 34 औषधांचा समावेश करण्यात आला असून 26 औषधे काढून टाकण्यात आली आहेत.
कॅन्सरपासून इतर औषधांचा समावेश
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 7 वर्षांनंतर औषधाची यादी अद्यावत केली आहे. यामध्ये कॅन्सर, मधुमेह, अॅन्टिबायोटीक, व्हॅक्सीन, सिगारेटचे व्यसन सोडणाऱ्या निकोटीनच्या औषधाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना महागडी औषधं स्वस्तात मिळू शकणार आहे.
ही औषधे होणार स्वस्त
नुकतीच अत्यावश्यक औषधांच्या राष्ट्रीय (NLEM) नवीनतम यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मधुमेहविरोधी औषध इन्सुलिन ग्लेर्जिन, अँटी टीबी औषध डेलामॅनिड, आयव्हरमेक्टिन आणि अँटीपॅरासाइट या औषधांचा समावेश आहे. तर कोरोना काळात इवरमेक्टिनचा वापर करण्यात येत होता. हे औषधही आता स्वस्त होणार आहे. इट्राकोनेजोल, मुपिरोसिन, टर्बिनाफिन, डेक्लाटेस्टिवर, मेरोपेनेम, सेफुरोक्साइम, एमिकासिन, बेडाक्विलाइन, एबीसी डोलटेग्रेविर यासारखी संसर्गजन्य आजारावरील औषधांचाही समावेश करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community